पारगाव, ता. १ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील पोलिस ठाण्याच्या वतीने भारत सरकार व गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील परिपत्रकानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० वी जयंतीनिमित्त एकता दौड आयोजित केली होती. या स्पर्धेत एकूण १७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. पारगाव कारखाना पोलिस ठाण्याच्या वतीने पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या एकता दौडमध्ये पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार तसेच पारगाव पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, पत्रकार वर्ग व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण ॲकॅडमीतील विद्यार्थी असे एकूण १७५ जणांनी सहभाग घेतला होता.
ही दौड पारगाव ग्रामपंचायत येथून सुरू होऊन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथून पुन्हा पारगाव ग्रामपंचायत येथे येऊन पार पडली. एकूण अडीच किलोमीटरची एकता दौड घेण्यात आली आहे. या मॅरेथॉनमधील सर्व स्पर्धकांना पोलिस ठाण्याच्या वतीने पाणी बॉटल, ओआरएस तसेच केळी व अल्पोहार देण्यात आल्या होत्या. या दौडमध्ये पारगाव पोलिस ठाण्याचे लक्ष्मण त्रिंबक नेहरकर, विपुल कांतिलाल कडू, पोलिस अंमलदार सुजाता मंगेश जाधव, पोलिस पाटील रूपेश सुनीलकर, नितीन मेंगडे व एम. व्ही. व्ही. पी. ॲकॅडमी लोणी यांच्याकडील जितेंद्र दशरथ विधाटे, मोहन बाळू भागवत, आदित्य संपत पोखरकर, स्नेहल सुनील टाके, प्रतीक्षा मच्छिंद्र पडवळ यांनी यशस्वीरीत्या अडीच किलोमीटर ची दौड पूर्ण केली असून स्पर्धेमधील विजेत्या व उत्तेजनार्थ यांना पदक देऊन गौरविण्यात आले.