Kolhapur Politics Update : कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी चंदगड चे आमदार शिवाजीराव पाटील, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते. चंदगड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले अप्पी पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
विविध निवडणुकांमध्ये सतेज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अप्पी पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी पाटील यांच्या समवेत नेसरीच्या सरपंच गिरीजा शिंदे नेसरीकर यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अप्पी पाटील यांच्यासारख्या जनसामान्यांशी नाळ जुळलेल्या कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात पक्षाला बळकटी मिळाली आहे असे नमूद केले.
Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेत नकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी घेतलं चांगलचं फैलावर, आयुक्तांनाही सुनावत आबिटकर म्हणाले...भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्यामुळे भविष्यात अप्पी पाटील यांनाही संधी मिळेल असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला. तर अप्पी पाटील यांनी बोलताना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांची साथ देण्याचा निर्णय झाला म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्याचे सांगितले. या पुढील काळात आम्ही दोघे मिळून प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र काम करू असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
आप्पी पाटील यांनी दोन वेळा विधानसभा निवडणुकीत 40 हजार मते मिळवली आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा सर्वच्या सर्व जागा जिंकेल असा विश्वास आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अंबरीश घाटगे, अशोक चराटी, अरुण देसाई, पी जी शिंदे, संभाजी आरडे, डॉ. आनंद गुरव, शिवाजी बुवा, के एस चौगले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.