Withdraw Money Without a Debit Card: बँकांच्या ग्राहकांसाठी एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता धनादेश देखील एकाच दिवसात क्लेअर होतो.
याशिवाय आपल्याजवळ डेविट कार्ड नसल्यास किंवा पासवर्ड विसरला असाल, तरीदेखील एटीएममधून 'फोन पे'च्या स्कॅनरद्वारे स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येतात, अशी सोय उपलब्ध आहे.
Egypt Tourism: आनंदाची बातमी! नोव्हेंबरमध्ये उघडणार मिस्रचे ग्रँड म्युझियम, ट्रॅव्हल प्रेमींसाठी नवीन हॉट डेस्टिनेशनबँकिंग क्षेत्रात अलीकडे खूपच ग्राहकांसाठी चांगले बदल झाले आहेत. पूर्वीसारख्या बँकांमधील ग्राहकांच्या रांगा आता दिसत नाहीत. 'एटीएम'मध्ये पैसे काढायला गेल्यावर अनेकदा चोरटे ग्राहकांची फसवणूक करतात.
'एटीएम' मशिनमध्ये कार्ड घालूनही पैसे बाहेर येत नसतात, तेव्हा कार्डची अदलाबदल करून अनेकांना चोरट्यांनी गंडा घातला आहे. या पार्श्वभूमीवर आता डेबिट कार्ड नसेल तरीदेखील मोबाईलमधील फोनचच्या स्कॅनरचा उपयोग करून एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात. सुरवातीला डेबिट की क्रेडिट कार्ड हे निवडावे लागते.
आपल्या बँक खात्यातून किती पैसे काढायचे ती रक्कम टाकावी लागते. त्यानंतर 'पासवर्ड (पिन) 'चा पर्याय निवडताना त्याखाली एक स्कॅनरचा पर्याय दिलेला आहे. त्यावर क्लिक केल्यास एटीएमच्या स्क्रीनवर स्कॅनर ओपन होतो. त्यानंतर आपल्या मोबाईलमधील फोनवर तो स्कॅनर स्कॅन करावा लागतो. त्यानंतर आपल्याला अपेक्षित रक्कम बँक खात्यातून मशीनमधून बाहेर येते अशी ही प्रक्रिया आहे.
Career Change: 40 व्या वर्षी करिअर बदलायचंय? या क्षेत्रांत आहे भविष्य आणि पैसा दोन्ही! 'एटीएम'चा पासवर्ड विसरला, तरी..गडबडीत अनेकदा डेबिट कार्ड घरी विसरले जाते. कधी कधी कार्ड सोबत असताना 'एटीएम' केंद्रावर गेल्यावर पासवर्ड आठवत नाही. त्यावेळी बँक खात्याला लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे पासवर्ड नवीन तयार करता येतो.
गुगलवर बँकेचे नाव टाकूनही तो नवीन पिन तयार करता येतो. परंतु, अनेकदा तो मोबाईल जवळ नसतो. त्यावेळी बँक खात्यात हजारो रुपये असूनही 'एटीएम'मधून काढता येत नाहीत. अशावेळी मोबाईलमधील 'फोन पे'च्या स्कॅनरवरून एटीएममधून आपल्या खात्यातील पैसे काढता येतात.