Famous Singer Daughter Wedding : प्रसिद्ध गायकाच्या लेकीने अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ, पाहा PHOTOS
Saam TV November 11, 2025 05:45 PM
Sudesh Bhosale daughter Wedding सुदेश भोसले लेकीचे लग्न

प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या लेकीचा शाही विवाह सोहळा पार पडला आले. नुकतेच सुदेश भोसले यांच्या लेकीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

सुदेश भोसले यांच्या लेकीचे नाव श्रुती भोसले आहे. श्रुतीने अभिनेता प्रतीक देशमुखसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Sudesh Bhosale daughter Wedding सुदेश भोसलेंचा जावई

श्रुतीचा नवरा आणि भोसले कुटुंबाचा जावई प्रतीक देशमुख हा उत्तम अभिनेता, लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे. प्रतीकने 'शुभ लग्न सावधान' चित्रपटात काम केले आहे.

Sudesh Bhosale daughter Wedding कौटुंबिक सोहळा

श्रुती आणि प्रतीकने कुटुंबातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नाला जवळचे मित्रमंडळी, कुटुंबीय यांनी उपस्थिती लावली.

Sudesh Bhosale daughter Wedding लग्नाची तारीख

10 नोव्हेंबर 2025 ला प्रतीक आणि श्रुती लग्नबंधनात अडकले. श्रुती आणि प्रतीकने पुण्यात लग्न केले. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत होते.

Sudesh Bhosale daughter Wedding साखरपुडा

ऑक्टोबर महिन्यात श्रुती आणि प्रतीकने गुपचूप साखरपुडा उरकला होता. फोटो शेअर करून त्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला.

Sudesh Bhosale daughter Wedding लग्नातील लूक

श्रुती आणि प्रतीकने लग्नात पारंपरिक लूक केला होता. श्रुतीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. पारंपरिक दागिने, केसात गजरा, नाकात नथ घालून नवरी सजली. तर प्रतीकने गोल्डन, पिवळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

Sudesh Bhosale daughter Wedding चाहता वर्ग

सध्या श्रुती आणि प्रतीकवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Suraj Chavan Wife NEXT : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास येथे क्लिक करा...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.