शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये राज्यातील या बड्या भाजप नेत्याने गुंतवला मोठा पैसा, पार्टनरशीप करत तब्बल…
Tv9 Marathi November 11, 2025 05:45 PM

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागील काही दिवसांपासून वादात सापडली आहे. शिल्पा शेट्टीसह तिचा पती राज कुंद्रा याच्यावर तब्बल 60 कोटींच्या फसवणुकीचे आरोप आहेत. हेच नाही तर त्यांना देश सोडण्यासही सक्त मनाई कोर्टाने केली. यादरम्यान कोर्टाने स्पष्ट म्हटले की, तुम्हाला विदेशात जायचे असेल तर जा पण 60 कोटी रूपये कोर्टात अगोदर जमा करा. शिल्पा शेट्टी हिने विदेशात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विदेशात जायचे असल्याचे म्हटले होते. मात्र, कोर्टाने त्यांना जाण्यास परवानगी नाकारली. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा कायमच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले असतात. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

शिल्पा शेट्टीचे नाव 60 कोटींच्या घोटाळ्यात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र, शिल्पा शेट्टीच्या बॅस्टियन रेस्टॉरंटची क्रेझ काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. शिल्पा शेट्टीचे बॅस्टियन रेस्टॉरंट खूप जास्त प्रसिद्ध आहे. नुकताच हे बॅस्टियन रेस्टॉरंट आता गोव्याला देखील सुरू करण्यात आलंय. मुंबईतील दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये 48 व्या मजल्यावर शिल्पा शेट्टीचे हे आलिशान बॅस्टियन ॲट द टॉप हे रेस्टॉरंट आहे.

या रेस्टॉरंटमधून शिल्पा शेट्टी कोट्यावधीची कमाई करते. येथे पदार्थांची किंमत खूप जास्त आहे. शिल्पा शेट्टीच्या  बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये राज्यातील एका बड्या भाजप नेत्याची तब्बल 33. 33 टक्क्यांचे भागीदारी आहे. होय तुम्ही खरे ऐकले. बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये भाजपाच्या नेत्याचे 33. 33  टक्के शेअर्स आहेत. भाजपाचा हा नेता दुसरा तिसरा कोणीही नसून प्रसाद लाड आहेत.

भाजपा नेते प्रसाद लाड यांची शिल्पा शेट्टीच्या बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये 33. 33  टक्के भागीदारी आहे. याबद्दल स्वत: प्रसाद लाड यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना माहिती दिली. रेस्टॉरंटचा आमचा फार मोठा बिझनेस आहे आणि माझ्या मुलाची ती आवड आहे, बॅस्टियनबद्दल तुम्ही ऐकलेच असेल त्यामध्ये शिल्पा शेट्टी, रणजीत बिंद्रा हे आमचे पार्टनर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. मागील काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचे हे रेस्टॉरंट प्रचंड चर्चेत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.