Ranji Trophy: शतक आणि 5 विकेट्स, टीम इंडियाच्या गोलंदाजाचा रणजी ट्रॉफीमध्ये धमाका, कोण आहे तो?
Tv9 Marathi November 12, 2025 06:45 AM

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबईने हिमाचल प्रदेशवर शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात डाव आणि 120 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर महाराष्ट्र विरुद्ध केरळ यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. तसेच यूपी टीमने चौथ्या फेरीत धमाकेदार विजय मिळवला. यूपीने नागालँडवर डाव आणि 265 धावांनी मात केली. शिवम मावी हा यूपीच्या विजयाचा प्रमुख नायक ठरला. शिवमने बॅटिंगसह बॉलिंगने ऑलराउंड कामगिरी केली.

वैभवन नागलँड विरुद्ध शतक झळकावलं. तर त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यूपीच्या या एकतर्फी विजयात शिवमची भूमिका निर्णायक राहिली. शिवमचं नागलँड विरुद्धचं त्याच्या कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं. त्यानंतर वैभवने नागालँडच्या अर्ध्या संघाला बाद केलं.

शिवमचा शतकी तडाखा

शिवमने नागालँड विरुद्ध पहिल्या डावात स्फोटक फटकेबाजी केली. शिवमने 87 बॉलमध्ये 101 रन्स केल्या. शिवमच्या या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. अर्थात शिवमने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 15 बॉलमध्ये 70 रन्स केल्या. शिवमने 116 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. शिवम आणि इतर फलंदाजांनी केलेल्या खेळीच्या जोरावर यूपीला पहिल्या डावात 500 पार मजल मारता आली. यूपीने 6 विकेट्स गमावून 535 रन्स केल्या. त्यानतंर युपीने डाव घोषित करुन नागलँडला बॅटिंगसाठी भाग पाडलं.

वैभवने बॅटिंगनंतर बॉलिंगने कमाल केली. एकट्या वैभवने नागालँडचा अर्धा संघ मैदानाबाहेर पाठवला. वैभवने 10 ओव्हर बॉलिंग केली. वैभवने केवळ 18 धावांच्या मोबदल्यात नागलँडच्या 5 फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे नागालँडचा पहिला डाव अवघ्या 177 धावांवर आटोपला.

नागलँडला फॉलोऑन

नागलँडच्या कामगिरीत फॉलोऑन मिळाल्यानंतर आणखी घसरण पाहायला मिळाली. नागालँडला पहिल्या डावात केलेल्या धावाही करता आल्या नाहीत. युपीने नागालँडला 153 धावांमध्ये गुंडाळलं. युपीने अशाप्रकारे हा सामना जिंकला.

यूपीने खात उघडलं

दरम्यान यूपीने नागालँडवर मात करत या हंगामातील पहिलावहिला विजय साकारला. युपीचा हा चौथा सामना होता. युपीचे 2 सामने अनिर्णित राहिले. तर 1 सामना पावसामुळे व्यर्थ गेला.

युपीचा पुढील सामना केव्हा?

दरम्यान युपी क्रिकेट टीम रणजी ट्रॉफी या स्पर्धेतील आपला पाचवा सामना हा 16 ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळणार आहे. युपीसमोर या सामन्यात तामिळनाडूचं आव्हान असणार आहे. हा सामना कोइंबतूरमधील श्री रामकृष्ण कॉलेज ऑफ कॉमर्स-सायन्सच्या मैदानात होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.