मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
Marathi November 12, 2025 12:26 PM

अभ्यास करताना मुलांचे लक्ष अनेकदा भरकटते. अभ्यासापेक्षा आजूबाजूच्या गोष्टींवर त्यांचं लक्ष अधिक जातं. परिणामी परिक्षेत कमी मार्क, नापास अशा गोष्टी घडतात. त्यामुळे सतत पालकांना मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची चिंता सतावत असते. अशा परिस्थितीत मुलांना ओरडून, धोपटून अभ्यासाला बसवण्यापेक्षा त्यांची एकाग्रता कशी वाढवता येईल यावर उपाय करायला हवेत. गोळ्या, औषंधे देण्याऐवजी आयुर्वेदाची प्राचीन प्रणाली तुम्ही वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊयात मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आयुर्वेदातील सोपे उपाय.

आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदानुसार मुलांच्या शरीरात पित्त दोषासोबत कफ आणि वात दोषांचे प्रमाण संतुलित हवे. हे प्रमाण संतुलित राहिल्यास बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत मिळते. वात दोष मज्जासंस्थेचे कार्य आणि स्मरणशक्तीसाठी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. जेव्हा शरीरातील वात दोष असंतुलन होतो तेव्हा स्ट्रेस निर्माण होतो. ज्यामुळे लक्ष केंद्रित करता येत नाही.

उपाय –

  • आयुर्वेद शरीरात वात वाढवणारे पदार्थ टाळण्याची शिफारस करतो. जसे की, थंड आणि दुग्धजन्य पदार्थ, जंक फूड. या पदार्थांऐवजी हिरव्या पालेभाज्या, ताजे अन्न मुलांना द्यावे.
  • दररोज मुलांच्या शरीराला आणि डोक्याला तिळाच्या तेलाने मालिश करावी. तेलाच्या मालिशने डोकं शांत राहतं आणि शांत झोपही लागते.

हेही वाचा – Parenting Tips: मुलांना शिस्त कोणत्या वयापासून लावावी?

  • भिजवलेले आणि सोललेले बदाम मुलांना खाऊ घातल्याने मेंदूची शक्ती सुधारण्यासाठी मदत मिळते.
  • मुलांकडून दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करून घ्यावं. ध्यानामुळे मानसिक शांती विकसित होण्यास मदत होते.

याव्यतिरिक्त आहारात औषधी वनस्पतींचा समावेश करता येईल.

औषधी वनस्पती –

  • ब्राम्ही मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी उत्तम औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीमुळे मेंदूची शक्ती सुधारते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
  • मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी वेखंड उत्तम आहे. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारते, जे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करते.
  • शंखपुष्पी स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. मुलांच्या आहारात याचा वापर करू शकता.

हेही वाचा – Feminine Hygiene Tips : शरीराच्या प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता महत्त्वाची का?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.