भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये येत्या 14 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर टेस्ट सीरीज सुरु होत आहे. या टेस्ट मॅचच्या 48 तास आधी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 बद्दल मोठी घोषणा झाली आहे. अपेक्षा होती तसं घडताना दिसतय. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेला युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेलला कोलकाता येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघात स्थान मिळेल. तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. मॅचच्या दोन दिवस आधी टीम इंडियाचे सहाय्यक कोच रायन टेनडशकाटे यांनी ही घोषणा केली.
ईडन गार्डन्सस्टेडिअमवर बुधवारी 12 नोव्हेंबरला टीम इंडियाच्या दूसऱ्या प्रॅक्टिस सेशनआधी पहिली प्रेस कॉन्फ्रेंस झाली. यात असिस्टेंट कोच टेनडेशकाटे यांनी प्लेइंग-11 बद्दल खुलासा केला ध्रुव जुरेलला खेळवण्याबद्दल असिस्टेंट कोचला विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “मला वाटतं की, आम्हाला कॉम्बिनेशन (प्लेइंग-11) ची चांगली आयडिया आहे. ध्रुव जुरेल मागच्या 6 महिन्यात ज्या प्रकारे खेळतोय. मागच्याच आठवड्यात बंगळुरुमध्ये त्याने दोन शतकं झळकावली होती. या आठवड्यात त्याचं खेळणं निश्चित आहे”
जुरेल कुठल्या दुसऱ्या खेळाडूच्या जागी खेळेल
ध्रुव जुरेल विकेटकीपर म्हणून खेळणार नाही. कारण टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत या सीरीजद्वारे पुनरागमन करतोय. पंत विकेटकीपर असेल. जुरेल कुठल्या दुसऱ्या खेळाडूच्या जागी खेळेल. जुरेल इन टीम झाल्यानंतर युवा ऑलराउंडर नीतीश कुमार रेड्डीला बाहेर बसावं लागेल असं टेनडेशकाटे म्हणाले. नितीश याआधी वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजचा भाग होता. पण त्याला जास्त संधी मिळाली नाही.
टेनडेशकाटे काय म्हणाले?
टेनडेशकाटे यांनी अलीकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख केला. दुखापतीमुळे रेड्डीला तिथे एकही सामना खेळता आला नव्हता. “सर्व प्रथम विजयाची रणनिती बनवावी लागेल. नितीश बद्दल आमच्या विचारात काही बदल झालेला नाही. त्याला ऑस्ट्रेलियात जास्त संधी मिळू शकली नाही. पण सीरीजच महत्व लक्षात घेऊन सांगिन की, ज्या पद्धतीची परिस्थिती इथे आम्हाला मिळेल, त्यावरुन नितीश या टेस्टसाठी बाहेर बसाव लागू शकतं” असं टेनडेशकाटे यांनी सांगितलं.