Dharmendra : मोठी बातमी! धर्मेंद्र रुग्णालयातून डिस्चार्ज, घरीच होणार उपचार
Saam TV November 12, 2025 09:45 PM

धर्मेंद्र यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

धर्मेंद्र यांच्यावर आता घरून उपचार केले जाणार आहेत.

बॉलिवूडचा ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra ) यांच्या प्रकृतीबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार करण्यात येणार आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिलेय. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होत.

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

दोन दिवसांपासून धर्मेंद्रयांच्या निधनाच्या बातम्यांची उलटसुलट चर्चा सुरू होती. पण त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

89 वर्षांचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता सुधारत आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली समजताच संपूर्ण कुटुंब रुग्णालयातपोहचले. वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबीय धर्मेंद्र यांचे हेल्थअपडेट देत आहेत. धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असल्याचे समजताच बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली. धर्मेंद्र यांचे चाहते सध्या ते लवकर बरे व्हावे याची प्रार्थना करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीची चर्चा पाहायला मिळत आहे.

आगामी चित्रपट

धर्मेंद्र यांचा 'इक्कीस'(Ikkis) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. नुकताच इक्कीसचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जयदीप अहलावत, एकवली खन्ना, सिकंदर खेर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे.

Govinda Hospitalised : अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली, तडकाफडकी रुग्णालयात दाखल
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.