Govinda Hospitalised : अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली, तडकाफडकी रुग्णालयात दाखल
Saam TV November 12, 2025 09:45 PM

बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची प्रकृती अचानक बिघडली.

गोविंदा यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोविंदा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

बॉलिवूडमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोविंदाची (Govinda) प्रकृती अचानक बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री मंगळवारी (11 नोव्हेंबर) रात्री ८ वाजता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला मुंबईतील जुहू परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

मीडिया रिपोर्टनुसार, Disorientation मुळे गोविंदा यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला औषधे देण्यात आली आणि पहाटे 1 च्या सुमारास त्यांना रुग्णालयातदाखल करण्यात आले. त्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत, ज्याचे निकाल येणे बाकी आहेत.

गोविंदा61 वर्षांचे आहेत. गोविंदा अचानक बेशुद्ध पडल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. बुधवारी अभिनेता गोविंदा यांना मुंबईतीलक्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. गोविंदाला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजताच चाहते चिंतेत दिसत आहे. तसेच गोविंदा लवकरच बरा व्हावा याची प्रार्थना करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

अलिकडेच गोविंदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत होते. गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसेच ते 'टू मच' या काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये देखील दिसले होते. चाहते आता गोविंदा यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

'Bigg Boss 19'मध्ये मिड-वीक एविक्शनचा धक्का; निलम, अभिषेकनंतर बिग बॉसने 'या' सदस्याला दाखवला बाहेरचा रस्ता
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.