सोनाक्षी सिन्हा हिने पहिल्यांदाच केला सासूबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, त्यांना अजिबातच…
Tv9 Marathi November 12, 2025 09:45 PM

शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षीने अनेक वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. अत्यंत खास पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले. सोनाक्षीने जहीरसोबत लग्न करावे, हे तिच्या दोन्ही भावांना मान्य नसल्याचे लग्नाच्यावेळी स्पष्ट झाले. सोनाक्षीचे दोन्ही भाऊ लग्नाला उपस्थित नव्हते. जवळच्या मित्रांसाठी लग्नानंतर खास पार्टीचे सोनाक्षीने आयोजन केले. सलमान खानसोबतच बॉलिवूडचे अनेक कलाकार या पार्टीला उपस्थित होती. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सोनाक्षी सिन्हा रूग्णालयात जाताना स्पॉट झाल्याने विविध चर्चांना उधाण आले. सोनाक्षी सिन्हा तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचेही सांगितले जातंय.

सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या प्रेग्नंसीबद्दल अत्यंत मोठा दावा केला. सोनाक्षी सिन्हा भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पाडकॉस्टमध्ये पोहोचली होती. यावेळी ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे करताना दिसली. सध्या सोनाक्षी सिन्हा ही तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सोनाक्षीने जहीरने लग्न होण्यापूर्वी आपल्याला काय काय सांगितले होते हे तिने सांगितले. हेच नाही तर लग्नानंतर जहीरची बाहेर राहण्याची इच्छा असल्याचे सोनाक्षीने म्हटले.

त्याला स्पष्टपणे आपण नकार दिला. सोनाक्षी सिन्हा लग्न झाल्यापासून पती जहीर इक्बाल याच्यासोबत फिरताना दिसते. सोनाक्षी जहीर इक्बाल याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहते. सोनाक्षीने म्हटले की, मला अजिबातच स्वयंपाक येत नाही पण माझी आई खूप जास्त चांगला स्वयंपाक बनवते. यावेळी सोनाक्षी ही तिच्या सासूबद्दलही मोठा खुलासा करताना दिसली. पहिल्यांदाच तिने तिच्या सासूबद्दल मोठे भाष्य केले.

सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, मला अजिबात स्वयंपाक करताना येत नाही, मला फक्त खाण्याची आवड आहे. माझ्या आईला माझी एकच चिंता राहत की, मला स्वयंपाक करता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सासूला देखील स्वयंपाक करता येत नाही. मी योग्य घरात आल्याचे त्या कायमच म्हणतात. मी जहीरच्या कुटुंबियांसोबत खास वेळ घालवते असाही खुलासा सोनाक्षीने केलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.