Ichalkaranji Woman Crime News : शहापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी (ता.१०) रात्री तारदाळ गावातील जी.के.नगर परिसरात छापा टाकून एका महिलेच्या ताब्यातून सुमारे २७३ ग्रॅम गांजा जप्त केला. लक्ष्मी आनंदा गुरव (वय ६०, रा. जी.के.नगर, तारदाळ) असे तिचे नाव असून, तिच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वीही गांजा विक्रीप्रकरणी तिच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मी गुरव ही संशयित महिला गांजा विक्रीसाठी आपल्या ताब्यात पुन्हा बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ ठेवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी (ता.१०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिच्या पत्र्याच्या घराजवळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गुरव हिच्याकडून सुमारे आठ हजार १९० रुपयांचा २७३ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा उग्र वासाचा गांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षककिशोरी साबळे, सहायक फौजदार अविनाश मुंगसे, पोलिस नाईक रोहित डावळे, सतीश कुंभार आदींच्या पथकाने केली.
Leopards Died Kolhapur : कोल्हापुरात यापूर्वी दोन घटनांत बिबट्याचा मृत्यू, पण तिसऱ्या घटनेत वाचल्याचे समाधान; रुईकर कॉलनीतील बिबट्याचा कसा झाला होता मृत्यूसंशयित गुरव ही महिला पूर्वीपासून अमली पदार्थ विक्री प्रकरणात गुंतलेली रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तिच्यासह तिच्या मुलावर शहापूर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गांजा विक्रीसंबंधी गुन्हे नोंद आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा तिच्याकडून अमली पदार्थ जप्त झाल्याने शहापूर पोलिस सखोल तपास करत आहेत.