पृथ्वीवरील ही जागा आहे सुर्याच्या एकदम जवळ,पृथ्वीचा मध्य म्हणतात याला,पाहा दोन्हींमध्ये किती आहे अंतर ?
GH News November 13, 2025 01:12 AM

तुम्ही एखाद्या पर्वतावर उभे आहात आणि त्याच्या टोकावर उभे असताना सुर्याची किरणे थेट तुमच्यावर पडत असतील.डोळे उघडण्यासाठी प्रयत्न कराल तर गॉगल शिवाय ते उघडत नाहीत अशी स्थिती. तर तुम्ही पृथ्वीच्या अशा टोकावर उभे आहात जेथून सुर्य तुमच्या सर्वात जवळ आहे. अशी जागा एखाद्या स्वप्नाप्रमाणे तुम्हाला वाटत असेल परतू प्रत्यक्षात हे सत्य आहे की पृथ्वीवर अशी जागा आहे.जेथे सुर्य तुमच्या अगदी जवळ वाटतो आणि त्याची उष्णाता तुमच्या त्वचेला जास्त प्रमाणात जाणवते…महत्वाचे हे ठीकाण एव्हरेस्ट नव्हे !

पृथ्वीवरील कोणती जागा सुर्यापासून जवळ

पृथ्वीवरील सजीव सुर्यामुळे जीवंत आहेत. त्याच्या प्रकाशामुळे आणि सर्व सृष्टी जीवंत राहू शकते. वनस्पती, पशु-पक्षी आणि हे पर्यावरण सर्वकाही सुर्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे. परंतू तुम्ही कधी विचार केला काय पृथ्वीवरील कोणती जागा सुर्याच्या एकदम जवळ आहे. सर्वसाधारणपणे लोकांना माऊंट एव्हरेस्ट ही जागा सुर्याच्या जवळ वाटत असावी. कारण तो समुद्र सपाटीपासून सर्वात उंच पर्वत आहे. परंतू सत्य काही वेगळे आहेत. पृथ्वीवरील सुर्याच्या सर्वात जवळची जागा इक्वाडोर येथील चिंबोराजो पर्वत आहे.

हा पर्वत द.अमेरिकेच्या एंडीज पर्वतमालेचा एक भाग आहे आणि एक सक्रीय ज्वालामुखी देखील आहे. मजेशीर बाब म्हणजे भलेही माऊंट एव्हरेस्ट समुद्र सपाटीपासून उंच पर्वत असेल. परंतू पृथ्वीच्या आकृती म्हणजे भूमध्य उभारामुले चिंबोराजो पर्वत पथ्वीच्या केंद्रापासूनचा सर्वात दूर बिंदू आहे.यामुळे सुर्याच्या सर्वात जवळची पृथ्वीचीही जागा आहे.

किती आहे उंची …

चिंबोराजो पर्वत समुद्र सपाटीपासून सुमारे 6,263 मीटर (20,549 फूट)उंच आहे. परंतू पृथ्वीच्या केंद्रापासून याचे अंतर 6,384 किलोमीटर आहे. जे एव्हरेस्ट पेक्षाही सुमारे २ किमी जास्त आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती या चिंबोराजो पर्वताच्या टोकावर उभा असेल तर तो पृथ्वीच्या कोणत्याही अन्य माणसापेक्षा सुर्याच्या अधिक जवळ असतो !

डोळे उघडे ठेवणे कठीण

ही जागा जितकी सुंदर आहे तितकीच प्रतिकूल देखील आहे. येथे हवा एकदम विरळ होत जाते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सुर्याची थेट किरणे इतकी तीव्र आहेत की गॉगल लावल्याशिवाय तुम्ही डोळ्यांच्या पापण्याही उघडू शकत नाही. येथे येणारे पर्यटक विशेष सनगिअर आणि सुरक्षा उपकरणे लावून ट्रेकींग करत असतात.

फोटो काढतात पर्यटक

इक्वाडोरमधील हा पर्वत केवळ वैज्ञानिक दृष्टीने महत्वाचा नसून एक मोठे पर्यटनस्थळही आहे.याच्या जवळ मिताद डेल मुंडो आहे. याचा अर्थ जगाचा मध्य बिंदू होय. हे ठिकाण ते आहे तेथे भूमध्य रेखा (Equator) पास होते. येथे एक प्रसिद्ध स्मारक आणि पिवळी रेषा आहे. ज्याच्या एका बाजूला उत्तर आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण गोलार्ध आहे.पर्यटक येथे दोन्ही गोलार्धावर एक-एक पाऊल ठेवून फोटो काढतात. म्हणजे एकाच वेळी दोन जगात पाय ठेवून आपण उभे आहोत असे ते दाखवतात.

सूर्याच्या सर्वात जवळचा बिंदु

चिंबोराजोचे स्थान पृथ्वी तिरप्यापणामुळे आणि भूमध्यीय उभाराने सुर्यापासून सुमारे 6,371 किलोमीटर सरासरी अंतरावर येते. मात्र, एव्हरेस्ट पासून हे अंतर काही मीटर जास्त आहे. हे सुक्ष्म अंतर यास पृथ्वीवरील सुर्याचा सर्वात जवळचा बिंदू बनवते. ही जागा केवळ भुगोलामुळे खास नसून मानवाच्या शोध आणि जिज्ञासेचे देखील प्रतिक आहे. कारण हे ते स्थान आहे जेथून कळते की निसर्गाची रहस्ये पृष्टभागावर नाही तर उंचीवर लपलेली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.