काँग्रेसने न्यायालयात जावं, अपील करावं; भाजपने राहुल गांधींना निवडणूक जिंकण्याची 'व्यवस्था'च सांगितली...
esakal November 13, 2025 02:45 AM

BJP Responds to Rahul Gandhi’s ‘Election System’ Charge : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत हरियाणातील विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी निवडणूक आय़ोगाला पुन्हा एकदा लक्ष्य केलं. तसेच त्यांनी भाजपावरही टीका केली. महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ दाखवला. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपाला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

भाजपाचे नेते किरण रिजिजू यांनी आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले, ''राहुल गांधींचा अॅटम बॉम्ब काही फुटत नाही. राहुल गांधी कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही. आज त्यांनी जो विषय मांडला तो पूर्णपणे खोटा आहे. हरियाणात निवडणूक सुरु असतानाचा त्यांची वरिष्ठ नेता कुमारी शैलजा यांनी सांगिलं होतं की हरियाणात काँग्रेस जिंकणार नाही, कारण हरियाणातील काँग्रेस नेतेच पक्षाचा पराभवासाठी काम करत आहेत.''

Kiren Rijiju: महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेणार :किरेन रिजिजू

पुढे ते म्हणाले, ''तीन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी सांगितलं की काँग्रेसनचे नेते काम करत नव्हते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही. एकीकडे काँग्रेस नेते पराभवाला पक्षाला जबाबदार धरत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी पराभवासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरत आहेत. इतक्या पराभवनांतर राहुल गांधी शिकायला तयार नाही'', अशी टीकाही त्यांनी केली.

''राहुल गांधी यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची क्लिप दाखवली. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांना उत्तर देतो आहे. या क्लिपमध्ये भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाची एक व्यवस्था असल्याचं म्हटलं आहे. पण ही व्यवस्था म्हणजे, आमची शिस्त, आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत, नेत्याचं समर्पण आहे. हीच आमची ताकद आहे, हीच आमची व्यवस्था आहे. त्यामुळे आम्ही आत्मविश्वासने सांगतो की आम्ही जिंकणार आहे'', असंही त्यांनी नमूद केलं.

Mallikarjun Kharge: खासदारांच्या अनुपस्थितीत सरकारकडून विधेयक मंजुरी; खर्गे यांची लोकशाहीवर टीका

''एसआयरनंतर बिहारमधील नागरिक आनंदी आहे. पण सर्वात जास्त दु:ख राहुल गांधी यांना होतं आहे. बिहारमध्ये राहुल गांधींनी प्रचाराला येऊ नये, असंही काँग्रेसच्या नेत्यांचाच वाटतं आहे. मुळात मतदान यादीतून नावं काढायची आणि टाकायची एक प्रक्रिया असते. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षाचा एजंट तिथे असतो. मतमोजणीच्या वेळीही राजकीय प्रक्षाचा प्रतिनिधी हजर असतो. संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शकपणे होते. इतकं झाल्यानंतरही कुणाला काही गडबड वाटली तर ती व्यक्ती थेट न्यायालयात जाऊ शकतो. पण राहुल गांधी असं न करता थेट माीडिया समोर येऊन बोलत आहेत''. अशाप्रकारे लोकशाही चालत नाही, असंही ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.