भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी 13 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यात अनऑफीशियल वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. तिलक वर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील पहिला सामना कुठे आणि कधी पाहायला मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.