मंगळवेढा : घराशेजारी खुर्चीत बसून वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पहात असताना ३० वर्षीय तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने खुर्चीवरून कोसळून उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कचरेवाडी येथे घडली. अजित कोंडिबा अनुसे (वय ३0 रा. कचरेवाडी) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत अजित अनुसे यांच्या घराशेजारी रविवारी रात्री वाघ्या मुरळीचा कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम अजित अनुसे त्याच्या मित्रासमवेत पाहत होता अचानक तो खुर्चीवरून कोसळला. नेमके काय घडले हे कोणाच्या लक्षात येईना.
दरम्यान तो कोसळल्याचे इतर मित्राने पाहिले अन् त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याच्या पक्षात पत्नीसह दोन अपत्य आहेत.