बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा ही काही न काही कारणामुळे चर्चेत असते. ती नेहमची सगळ्या ट्रेडच्या विरोधात जाऊन काही न काही वेगळं करत असते. प्लेबॉय मॅगझिनच्या कव्हरमध्ये पहिली भारतीय महिला म्हणून ती समोर आली. शार्लिनचा तो सगळ्यात मोठा निर्णय होता. शार्लिनने तिच्या शरिरावर फिलर्स आणि इम्प्लांट्स केले होते. परंतु आता ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीय.
शार्लिननं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तिने सर्व फिलर्स आणि इम्प्लांट्स काढण्याचा टाकणाचा निर्णय घेतलाय. दोन वर्षापूर्वीच तिने इम्प्लांट्स केले होते. त्यानंतर आता तिने पुन्हा ते इम्प्लांट्स काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता ती पुन्हा चर्चेत आलीय. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'मी फिलर्स किंवा इम्प्लांट्सची निंदा करत नाहीय. परंतु मी माझ्या मुळ रुपात येऊ इच्छिते.'
View this post on Instagram
पुढे बोलताना शार्लिन म्हणाली की, 'गेल्या काही दिवसापासून माझ्या पाठीत, छातीमध्ये दुखत होतं. मानेचा सुद्धा त्रास मला जाणून लागला होता. या सगळ्यात मला प्रचंड वेदना व्हायच्या. छातीला सुद्धा मोठ्या प्रमाणात वजन जाणवत होतं. त्यामुळे मी डॉक्टरांना ब्रेस्ट इम्लांट्सचा त्रास होत असल्याचं सांगितलं. मला त्याचा माझ्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे मी ते काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय.'
'मी थोडी यामुळे नर्व्हस झाली आहे. आता मी खुप एक्साइटेड आहे की मी आता माझ्या नको त्या वजनाशिवाय जगू शकते. मी आता एक नवी सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता मी नव्या प्रवासाबद्दल फार उत्सुक आहे.' असं ती तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाली होती.
दरम्यान शार्लिनने ऑगस्ट 2023 मध्ये चेहऱ्यावर फिलर्स आणि ब्रेस्ट इम्प्लांट्स केलं होतं. परंतु त्रास होत असल्यानं ती ते सर्व काढत आहे. शार्लिन बद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे. तिने दिल बोले हडिप्पा, वजह तुम हो, कामसूत्र अशा चित्रपटातून आपलं काम दाखवून दिलं आहे.
Girija Oak National Crush : न्यू नॅशनल क्रश गिरिजा ओक! निळ्या रंगाच्या साडीत असं काय आहे की, चाहत्यांना वेड लावलं?