Delhi Blast : सेंकड हँड कार विकत घेण्यापूर्वी, हे डिटेल्स चेक करा, अन्यथा…
GH News November 13, 2025 08:21 PM

नुकत्याच झालेल्या दिल्ली ब्लास्टने देशाला हादरा बसला आहे. तपासात स्फोटासाठी वापरलेली कार सेकंड हँड होती. या कारचा मालकी हक्क नीट प्रकारे झाला नव्हता. या घटनेने एक सवाल निर्माण झाला आहे की जुनी कार खरेदी करताना किंवा विकताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भात अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. जुनी कार विकत घेतना खूप काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे जुनी कार खरेदी करताना काय काळजी घ्यायची ते पाहूयात..

कारची आरसी, विमा, पीयूसीसी, एनओसी नीट तपासा

भारतात दर महिन्याला लाखो सेकंड हँड कार विकल्या किंवा खरेदी केल्या जात असतात. परंतू बहुतांश लोक ही कागदपत्रं तपासणी एक औपचारिकता म्हणून पूर्ण करतात. अनेकदा जुन्या कार चुकीच्या हाती गेल्या तर असली मालकाना विनाकारण अडचणीचा सामना करावा लागतो. दिल्ली ब्लास्ट प्रकरणात देखील हेच झाले आहे. कारच्या कागदपत्रात जुन्या मालकाचे नाव होते,त्यामुळे तपास यंत्रणांनी आधीच त्याला संशयित मानले. त्यामुळे तुम्ही जुनी कार विकत घेत असाल तर सावधान व्हा ! कारची आरसी, विमा, पीयूसीसी, एनओसी आणि ओनरशिप ट्रान्सफरची स्थिती नीट जाणून घ्या. कारण तुमची एक हलगर्जी भविष्यात तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवू शकते.

आजच्या काळात जुनी आणि वापरलेली कार खरेदी करणे किंवा विकणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. परंतू या प्रक्रीयेत सर्व सर्वात महत्वाचे कारचा मालकी हक्क ट्रान्सफर करणे असते. अनेक लोक कागदपत्राची पूर्तता करतात. परंतू या स्टेटला नजरअंदाज करतात. परंतू सर्वात महत्वाचे काम असून ते टाळू नये. कारण नाव जर ट्रान्सफर झाले नाही तर भविष्यात दंड तसेच कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

जुनी कार विक्री किंवा खरेदी नंतर सेलर आणि बायर दोन्ही मिळून ओनरशिप ट्रान्सफरची प्रक्रीया पूर्ण करावी लागते. यासाठी आरटीओने जारी केलेले काही निर्धारित फॉर्म आणि कागदपत्रे भरावी आणि जमा करावी लागते.

ओनरशिप ट्रान्सफरसाठी फॉर्म 29 आणि फॉर्म 30 भरणे गरजेचे आहे. जर गाडी कोणा दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करायची असेल तर फॉर्म 28 (NOC) ची गरज असते. जो आधीच्या आरटीओमधून जारी केला जातो. तसेच जर कारवर लोन असेल तर बँककडून फॉर्म 35 आणि एनओसी देखील घेणे गरजेचे असते त्यामुळे बँकेचे लोन संपूर्ण फेडल्याचे स्पष्ट होते.

सर्व कागदपत्रे तयार करा

सेलरला वाहनाचे ओरिजनल आरसी (RC), वैध इंश्योरन्स आणि पीयूसीसी (PUCC) जमा करावा लागतो. बायरला आपली ओळख आणि पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ आधारकार्ड व्होटर आयडी द्यायचा असतो. दोन्ही पक्षांना पासपोर्ट साईज फोटोसह सर्व डॉक्युमेंट्सना फॉर्म्स सोबत आरटीओत जमा करावे लागते. काही राज्यात पॅनकार्ड वा फॉर्म 60/61 आणि ट्रॅफीक पोलिसांकडून क्लिअरन्स रिपोर्ट देखील मागितला जातो.

आरटीओत कागदपत्रे जमा करावे

सर्व डॉक्यूमेंट्स आणि फॉर्म्सना खरेदीराच्या नव्या आरटीओ कार्यलयात जमा करायचे असते. हे काम तुम्ही Parivahan.gov.in वेबसाईट द्वारे ऑनलाईन सुतरु करु शकता. परंतू सही केलेल्या हार्ड कॉपीला आरटीओत ऑफलाईन जमा करणे गरजेचे असते.

फी आणि टॅक्सचा भरणा करणे

कारच्या नव्या मालकाला ट्रान्सफर फि, थकलेला कर, आणि कोणतेही जुन्या दंडाचा भरणा करावा लागतो. असे न केल्यास आरटीओ ओनरशिप ट्रान्सफर रोखू शकतो.

नवीन आरसी प्राप्त करणे

सर्व कागदपत्रांचे व्हेरिफीकेशन केल्यानंतर आरटीओ नव्या मालकाच्या नावावर नवे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) जारी करतो. ही सर्व प्रक्रिया साधारणपणे काही आठवड्यात पूर्ण होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.