IND vs SA : दक्षिण आफ्रिका ही…, पहिल्या कसोटीआधी कॅप्टन शुबमन गिल काय म्हणाला?
GH News November 13, 2025 10:39 PM

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया शुक्रवार 14 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा एक्शन मोडमध्ये असणार आहे. टीम इडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकातीमधील ईडन गार्डन्समध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आपली अखेरची कसोटी मालिका ही आशियात खेळली आहे. भारताने विंडीजचा मायदेशात 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. तर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान विरुद्धची 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राखली. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी ही तुल्यबळ आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना पहिल्या कसोटीत चुरस पाहायला मिळू शकते. या सामन्याआधी भारतीय कर्णधार शुबमन गिल याने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आव्हानासाठी सज्ज असल्याचं म्हटलं.

पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी 13 नोव्हेंबरला पत्रकार परिषद पार पडली. शुबमनने दक्षिण आफ्रिका चांगली टीम असल्याचं म्हटलं. तसेच आम्हाला टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला खेळायचा आहे. त्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची असल्याचं कॅप्टन शुबमनने नमूद केलं.

कॅप्टन शुबमन काय म्हणाला?

“या मालिकेत आम्हाला 2 सामने खेळायचे आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनल खेळण्यासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. दक्षिण आफ्रिका ही फार चांगली टीम आहे. ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहेत. आम्हाला माहितीय की आमच्यासाठी ही मालिका सोपी नसणार. मालिकेत अवघड वेळ येईल. मात्र आम्ही संघ म्हणून आव्हानात्मक स्थितीचा सामना केलाय हे दाखवून दिलं आहे”, असं शुबमन गिल याने सांगितलं.

शुबमन पीचबाबत काय म्हणाला?

“कॅप्टन शुबमनने इडन गार्डन्समधील खेळपट्टीबाबत भाष्य केलं. ही टीपीकल भारतीय खेळपट्टी आहे. हा सामना रंगतदार होणार आहे”, असा अंदाज शुबमने व्यक्त केला.

भारताने ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर आता टीम इंडिया भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे वेळ, परिस्थिती आणि सर्वच बाबींचा फरक पडणार आहे. या मुद्द्यांना हात घालत पत्रकाराने शुबमनला प्रश्न केला. यावर शुबमन म्हणाला की, ” विदेशातून भारतात आल्यानंतर 3-4 दिवसांतच दुसऱ्या फॉर्मेटमध्ये खेळणं सोप नसतं. मानसिकरित्या हे आव्हान असतं”, असं शुबमनने सांगितलं.

“ऑस्ट्रेलियामध्ये टाईम झोन वेगळा होता. शरीराला परिस्थितीनुसार बदल करण्यात वेळ लागतो. क्रिकेटर म्हणून आपल्याला या आव्हानांचा सामना करावा लागणार याची कल्पना असते. तुम्ही या आव्हानांचा कसा सामना करता? हे तुमच्यातील खेळाप्रती असलेल्या समर्पण भावातून दिसून येत”, असं शुबमनने स्पष्ट केलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.