टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालंय. उभयसंघातील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारी 14 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यात अनऑफीशीयल वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. भारतीय अ संघाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने या मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. ऋतुराजने मालिकेतील पहिल्याच सामन्यात संयमी अर्धशतक झळकावलं आहे.
उभयसंघातील पहिला सामना हा राजकोट खांदेरीतील निरंजन शाह स्टेडियममध्ये होत आहे. शुबमनने या सामन्यातील दुसऱ्या डावात विजयी धावांचा पाठलाग करताना अर्धशतक पूर्ण केलं आहे. ऋतुराजने 286 धावांचा पाठलाग करताना 50 धावा पूर्ण केल्या. ऋतुराजने अर्धशतकासाठी 52 चेंडूंचा सामना केला. ऋतुराजने 96.15 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. ऋतुराजने अर्धशतकातील 50 पैकी 30 धावा या अवघ्या 7 चेंडूत पूर्ण केल्या. ऋतुराजने या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला.
ऋतुराज आणि अभिषेक शर्मा या जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांना आणखी मोठी भागीदारी करण्याची संधी होती. मात्र अभिषेक शर्मा आऊट झाला आणि ही जोडी फुटली. अभिषेक शर्मा याचा त्याच्या कारकीर्दीतील इंडिया ए साठीचा पहिलाच एकदिवसीय सामना होता. त्यामुळे चाहत्यांना अभिषेककडून टी20i प्रमाणे इथेही चाबुक बॅटिंगची आशा होती. अभिषेकने संयमी सुरुवात करत संधी मिळेल तेव्हा फटके मारले. मात्र अभिषेक 31 धावांवर आऊट झाला. अभिषेकने 25 बॉलमध्ये 124 च्या स्ट्राईक रेटने 31 रन्स केल्या. अभिषने या दरम्यान 1 सिक्स आणि 4 फोर लगावले.
दरम्यान त्याआधी दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 285 रन्सपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेसाठी डेलानो पॉटगीटर, डायन फॉरेस्टर आणि ब्योर्न फोर्टुइन या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. या तिघांनी 90, 77 आणि 59 धावांचं योगदान दिलं. तर भारतासाठी अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर निशांत सिंधू, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.