Team India A : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, जितेश शर्माकडे नेतृत्व, वैभव सूर्यवंशीचा समावेश, कुणाचं आव्हान?
GH News November 13, 2025 11:16 PM

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाच्या सामन्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. मात्र ही प्रतिक्षा येत्या काही तासांत संपणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला शुक्रवारी 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. एका बाजूला सिनिअर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए टीम एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. इंडिया ए टीम या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई विरुद्ध भिडणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध यूएई ए सामना कधी?

इंडिया ए विरुद्ध यूएई ए सामना शुक्रवारी 14 नोव्हेंबरला होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध यूएई ए सामना कुठे?

इंडिया ए विरुद्ध यूएई ए सामना दोह्यातील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध यूएई ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया ए विरुद्ध यूएई ए सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंडिया ए विरुद्ध यूएई ए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

इंडिया ए विरुद्ध यूएई ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंडिया ए विरुद्ध यूएई ए लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

इंडिया ए विरुद्ध यूएई ए लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहता येईल.

इंडिया ए टीमचा कॅप्टन कोण?

अमरावतीकर जितेश शर्मा हा इंडिया ए टीमचं या स्पर्धेत नेतृत्व करणार आहे. जितेशला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत नेतृत्वाचा अनुभव आहे. तसेच जितेशने आयपीएलच्या 18 व्या मोसमात आरसीबीला चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच जितेश नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी 20I मालिकेचा भाग होता.

जितेश व्यतिरिक्त इंडिया ए टीममध्ये अनेक युवा आणि अनकॅप्ड खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी, मुंबईक सूर्यांश शेंडगे, नेहल वढेरा, रमणदीप सिंह, सुयश शर्मा याच्यासह इतर खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

यूएईचा कॅप्टन कोण?

अलिशान शराफू याला यूएईच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. मुळचा केरळचा असलेला अलिशान याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. अलिशानने यूएईचं 28 वनडे आणि 62 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.