भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सप्टेंबर महिन्यात आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला धुव्वा उडवत सलग दुसर्यांदा आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. त्यानंतर आता 14 नोव्हेंबरपासून एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या 8 संघात एकूण 15 टी 20 सामने होणार आहेत. स्पर्धेतील अंतिम सामना हा 23 नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेतील 8 संघांना ए आणि बी अशा 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. त्यानंतर अंतिम सामन्याचा थरार रंगेल आणि विजेता निश्चित होईल.