देशी दारू सामान्यपणे जे लोक गरीब आहेत, जे लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात ते लोक ही दारू पिताना दिसतात. तसेच आजही ग्रामीण भागांमध्ये विदेशी मद्य किंवा दारू सहज उपलब्ध होत नसल्याने तसेच त्याची किंमत आवाक्याच्या बाहेर असल्यानं अनेकजण देशी दारू पिताना दिसतात. सामान्यपणे देशी दारू तयार करण्याची प्रक्रिया आणि वेदशी दारू ज्यामध्ये रम, व्हिस्की, वोडका, ब्रँडी, बिअर अशा दारूचा समावेश होतो, ते विदेशी मद्य तयार करण्याची प्रक्रिया एक सारखीच असते. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की देशी दारू स्वस्तात मिळते मग विदेशी मद्य इतके महाग का मिळतात? सामान्यपणे जो भाग स्लम आहे, ज्या भागांमध्ये झोपडपट्टी आहे, लोक गरीब आहेत, अशा भागांमध्ये तुम्हाला देशी दारूचे दुकानं दिसून येतात, तर विदेशी मद्यांची दुकानं ही उच्चभ्रू लोकांच्या वसाहती जिथे असतात तिथे दिसून येतात.
चवीत फरक पण बनवण्याची पद्धच एकच
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, देशी आणि विदेशी दारूच्या चवीमध्ये फरक असतो, मात्र ती बनवण्याची सर्वसामान्य पद्धत एकच असते. दोन्ही दारू बनवण्यासाठी धान्य आणि इतर कृषी उत्पादनाचा वापर होतो. या दोन्ही दारू एकाच पद्धतीने तयार केल्या जातात, सामान्यपणे देशी दारू ही तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये उपलब्ध होते, आणि तेच जर तुम्ही विदेशी दारूबाबत बोलात तर ही दारू नेहमी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या लेबल लावलेल्या काचेच्या बाटलीमध्ये मिळते.
दोन्ही दारूमध्ये किमतीचा एवढा फरक का?
दोन्ही दारूमध्ये किमतीचा फरक यासाठी आहे की अनेकदा देशी दारू ही अवैध मार्गानं बनवली जाते, अशा दारूवर कुठलाही सरकारी टॅक्स लागत नाही, त्यामुळे तिची किंमत आपोआप कमी होते, मात्र जे देशी दारूचे अधिकृत विक्रेते आहेत, त्यांच्यावर नियमानुसार टॅक्स लावला जातो. दुसरं म्हणजे विदेशी दारू ही मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये तयार केली जाते, त्यामुळे तेथील मनुष्यबळाचा खर्च, लाईट बील, मशनरीचा खर्च याचे पैसे त्यामध्ये अॅड होतात, विदेशी मद्यावर तुलनेनं टॅक्स जास्त असतो. तसेच या मद्याची जाहिरात करण्यासाठी त्यावर भरमसाठ पैसा खर्च होतो, त्यामुळे विदेशी दारू ही देशी दारूच्या तुलनेत खूप महाग असते, सर्वसामान्य लोक ही दारू खरेदी करू शकत नाहीत, त्यामुळे आजही भारताच्या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचीच मोठ्या प्रमाणात विक्री होते.