वारजे : वारजे वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर मंगळवारी आणि बुधवारी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ३२४ वाहनचालकांवर कारवाई करून दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगने यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला पोलिस उपनिरीक्षक माधवी शेवाळे व राकेश कांबळे तसेच वारजे वाहतूक विभागाचे कर्मचारी, वाहतूक नियंत्रण कक्ष येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली.
Pimpri Chinchwad Crime : चिंचवडमध्ये गुटख्याचा मोठा साठा जप्त; चिखली पोलिसांची कारवाई, एकाला अटक!या मोहिमेदरम्यान ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाईल वापरून वाहन चालविणे, तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सजगने यांनी सांगितले की, ‘वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि अपघातमुक्त वारजे घडविण्यासाठी सहकार्य करावे.’