-rat१२p२३.jpg-
२५O०४००५
राजापूर ः प्रात्यक्षिकामध्ये सहभागी स्वयंसेवक.
-----
जैतापुरात नागरिक संरक्षणावर प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः नागरी संरक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने आणि उपनियंत्रक, नागरी संरक्षण दलातर्फे क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण शिबिर जैतापूर येथे झाले.
जिल्हा उपनियंत्रक अधिकारी कर्नल प्रशांत चतूर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरामध्ये नागरिकांना संरक्षण या विषयांवर सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाची अनुभूती घेतली. प्रशिक्षणाच्या समारोपाला नाटे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, जैतापूर प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश रूमडे, प्रशिक्षक आननसिंग गढरी, अक्षय जाधव, जैतापूर ग्रामपंचायत उपसरपंच मीनल मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर, सिकंदर करंगुटकर आदी उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये नागरी संरक्षण दलाची मूलभूत तत्त्वे, आपत्ती व्यवस्थापन, आग नियंत्रण, सीपीआर, जैविक-रासायनिक-परमाणू सुरक्षा, प्रथमोपचार, स्वबचाव कार्य आणि आपत्कालीन प्रसंगी नागरिकांचे संरक्षण या विषयांवर सैद्धांतिक तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.