नेरुरकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला राज्यस्तरीय कुस्तीत कांस्य
डोंबिवली, ता. १३ (बातमीदार) ः रा. वि. नेरुरकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज म्हात्रे या विद्यार्थ्याने कांस्य पदक मिळवले आहे. या यशाबद्दल त्याचे महाविद्यालयांच्या प्राचार्या, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे हेदुटणे गावामधून त्याची भव्य मिरवणूकही काढण्यात आली आहे.