सफाई कामगारांचे एकदिवसीय उपोषण
मुलुंड, ता. १३ (बातमीदार) : सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावी, यासाठी एकदिवसीय उपोषण बुधवारी (ता. १२) आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले. या कामगारांचे नेतृत्व म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यानंतर संघटनेतर्फे पालिका प्रशासनाला एक लेखी निवेदन देण्यात आले.