भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी शुक्रवारी कोलकातामध्ये सुरू होईल.
या मालिकेसाठी मोहम्मद शमीला भारतीय संघात न निवडल्याने निवड समितीवर टीका झाली होती.
शुभमन गिलने मोहम्मद शमीला संघातून वगळण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात शुक्रवारपासून (१४ नोव्हेंबर) दोन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२६ स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. दक्षिण आफ्रिका या स्पर्धेचे गतविजेते आहेत. पण त्यांच्यासमोर मायदेशात खेळणाऱ्या भारतीय संघाचे मोठे आव्हान आहे.
Mohammad Shami ला टीम इंडियातून बाहेर काढण्याचा कारणच नाही, सौरव गांगुली अजित अगरकरच्या निवड समितीवर संतापला...दरम्यान, या मालिकेसाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा मोहम्मद शमीला संघात स्थान न देण्यावरून बरीच चर्चा झाली. आता याबाबत कोलकातामध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.
गुरुवारी (१३ नोव्हेंबर) गिल पत्रकार परिषदेत उपस्थित होता, त्याने यावेळी अनेक विजयांवर भाष्य केले. त्याने शमीला संघातून वगळण्याबाबत म्हटले की हा कठीण निर्णय आहे, पण संघातील इतर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे.
आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीतून शमी सावरला असून त्याने रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतून पुनरागमनही केले. त्याने पश्चिम बंगालकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. मात्र असे असतानाही, त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. त्याने त्याला भारतीय संघातून वगळण्याबाबत स्पष्टपणे नाराजीही व्यक्त केली होती. त्याला वगळण्यावरून भारताच्या निवड समितीवर टीकाही झाली होती.
R Ashwin: 'भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही अप्रत्यक्षपणे घडतंय...' शमी-आगरकर वादानंतर अश्विनला नेमकं काय म्हणायचंय?याबाबत बोलताना गिल म्हणाला, 'नक्कीच त्याच्यासारखा दर्जा असणारे गोलंदाज जास्त नाहीत. पण सध्या खेळत असलेल्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली आहे. आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा यांच्याकडेही दुर्लक्ष करू शकत नाही, तर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांचीही कामगिरी चांगली झाली आहे. त्यामुळे कधी कधी हे कठीण असते की शमी भाईसारखा खेळाडू संघात नसतो. पण आम्हाला पुढचा विचारही करावा लागले, विशेषत: परदेशात दौरे करताना.'
याशिवाय त्याला जेव्हा विचारण्यात आले की शमी भारतीय संघाच्या भविष्यातील योजनेमध्ये आहे का, त्यावर गिलने उत्तर दिले की 'याचं उत्तर चांगलं निवड समितीच देऊ शकते.'
मोहम्मद शमीने नुकतेच तीन रणजी ट्रॉफी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १५ विकेट्स घेतल्या. त्याने गुजराजविरुद्ध ८ विकेट्स घेतल्या, तर उत्तराखंडविरुद्ध ७ विकेट्स घेतल्या होत्या.