SA vs IND : दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, ऋषभ पंतचं कमबॅक, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
GH News November 14, 2025 12:30 PM

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील इडन्स गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय गोलंदाज पाहुण्या संघाला किती धावांवर रोखतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल

टीम इंडियाकडून पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 विकेटकीपर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. नियमित उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याचं कमबॅक झालं आहे. पंतला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून पंत टीम इंडियापासून दूर होता. मात्र आता पंतने दुखापतीवर मात करत भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. तसेच विकेटकीपर ध्रुव जुरेल यालाही संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा(कॅप्टन), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.