हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या लढतीमध्ये हिंदुस्थानने अचंबित करणारा संघ निवडला असून गिल सेना तब्बल 4 फिरकीपटू घेऊन मैदानात उतरली आहे. तसेच डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याची गच्छंती करण्यात आली असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे संघात पुनरागमन झाले आहे.
कोलकाता कसोटीमध्ये हिंदुस्थानने चार फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यासह वॉशिंग्टन सुंदरची संघात वर्णी लागली आहे. साई सुदर्शनला डच्चू दिल्याने वॉशिंग्टन सुंदर हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थानचे अंतिम 11 खेळाडू –
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
आफ्रिकेचे अंतिम 11 खेळाडू –
एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (उजवीकडे), टोनी डी जोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरे (उजवीकडे), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज