पाटणा : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मतदान केलेल्या मतदारांची लिंगभावानुसार माहिती जाहीर न केल्याबद्दल राष्ट्रीय जनता दलाचे(आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान होऊन चार दिवस उलटले तरी आयोगाने लिंगभावानुसार आकडेवारी जाहीर न केल्याने तेजस्वी यांनी संताप व्यक्त केला. पाटणा येथे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तेजस्वी यांनी दावा केला की, बिहारमधील ‘आरजेडी’च्या नेतृत्वाखालील महाआघाडी या निवडणुकीत मतचोरी किंवा गैरप्रकार होऊ देणार नाही.
Amit Shah: तेजस्वींना मुख्यमंत्री करण्याचे ध्येय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका‘‘सहा नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर चार दिवस उलटूनही निवडणूक आयोगाने पुरुष व महिला मतदारांच्या सहभागाचा तपशील जाहीर केलेला नाही. हे पहिल्यांदाच घडत आहे. यापूर्वी ही माहिती तत्काळ दिली जात असे,’’ असे तेजस्वी म्हणाले.
पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकारमुळे निवडणूक आयोगाचे कामकाज योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘‘निवडणूक आयोगाशी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संगनमत करून निवडणुकीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आम्ही मतचोरी होऊ देणार नाही.’’
Amit Shah: तेजस्वींना मुख्यमंत्री करण्याचे ध्येय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका सुरक्षेवरून टीकाबिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलांच्या एकूण २०८ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून त्या सर्व भाजपशासित राज्यांतील आहेत, असा दावा तेजस्वी यांनी केला. या सर्व तुकड्या भाजपशासित राज्यांतूनच का आणल्या, असा सवाल करत आम्ही त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहोत, असे तेजस्वी म्हणाले. ‘‘सुमारे ६८ टक्के पोलिस निरीक्षकही भाजपशासित राज्यांतून येथे आणण्यात आले आहेत, असे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.