Belgaum News: दोन वर्षांपूर्वी बनलेला रस्ता आता कचऱ्याने भरला; प्रकाशव्यवस्था नसल्याने धोका वाढला
esakal November 14, 2025 01:45 PM

सदाशिवनगर: कुमारस्वामी लेआउट ते हिंडलगा रोडपर्यंत असलेल्या बॉक्साईट रोडवर कचरा डम्पिंग ग्राउंड तयार होत आहे. परिसरातील काही लोक आपल्या कॉलनीतील कचरा महापालिकेच्या कचरा उचल वाहनाकडे न देता बॉक्साईट रोडवर आणून टाकत आहेत. रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने भटक्या कुत्र्यांची समस्याही निर्माण झाली आहे.

रस्त्यावरील कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्व्याप वाढला आहे. परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने अन्नाच्या शोधात कुत्री रस्त्यावरच भटकत आहेत. त्यामुळे अचानक ही कुत्री वाहनासमोर आडवी येत असून अपघाताचा धोका वाढला आहे. gum news

Belgaum News: खानापूर तालुक्यात मराठी शाळांवर कन्नड शाळांचा ग्रहण! दोन मुलांसाठी सुरू केली शाळा, गावकऱ्यांमध्ये संताप

कचऱ्याची उचल केली जात नाही, त्यामुळे रस्त्यावरच कचरा कुजत असून दुर्गंधी पसरू लागली आहे. रस्त्यावर टाकला जाणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. वाऱ्यामुळे हे प्लास्टिक रस्त्यावर उडून पडत आहेत.

प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. महापालिकेने या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन रस्त्यावरील कचरा उचल करणे गरजेचे ठरले आहे.

Belgaum News : महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल...

मात्र, तसे होत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत चालली आहे. रस्त्यावरच कचरा कुजत असल्याने डासांचा प्रादुर्भाव देखील वाढत असून परिसरात आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे वेळीच परिसरातील कचरा समस्येवर लक्ष देणे गरजेचे ठरले आहे.

दोन वर्षांपूर्वी बॉक्साईट रोडचे काम पूर्ण झाले. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा अजूनही मातीचे ढिगारे मात्र हटविण्यात आलेले नाहीत. हनुमाननगर परिसरात मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असून जुन्या इमारतींचे अवशेष टाकाऊ दगड, विटा आणि माती या ठिकाणी आणून टाकण्यात आली आहे.

त्यावर झाडेझुडपे देखील वाढली आहेत. या ठिकाणी रस्ता जरी झालेला असला तरी दिव्यांची सोय नसल्याने सायंकाळनंतर पूर्णपणे अंधार पडलेला असतो. त्यामुळे या ढिगाऱ्यांचा नेमका अंदाज येत नसल्याची वाहनचालकांतून तक्रार करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.