पुणे: गुरुवारी सायंकाळी पुण्यात झालेल्या भीषण अपघाताने (Horrific Accident) राज्यभरात खळबळ उडाली. मुंबई–बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने सलग वाहनांना जोरदार धडक (Horrific Accident) दिली. या धडकेत आठ ते दहा वाहने चिरडली गेली, तर एका कारचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन त्याला आग लागली. या दुर्घटनेत कारमधील प्रवाशांसह एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, अपघात (Horrific Accident) सायंकाळी साधारण ५.४५ वाजता झाला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर स्वामीनारायण मंदिराजवळील तीव्र उतारावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रक पुढे जाताना मार्गातील अनेक वाहनांवर धडक देत सरकत राहिला. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट दिसतो आहे. (Horrific Accident)
या अपघातात एका कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ती कार ट्रकच्या समोरच्या भागात अडकली आणि सोबत फरफटत पुढे गेली. पुढे जाऊन याच ट्रकने दुसऱ्या एका ट्रकला धडक दिली. दोन ट्रकच्या मध्ये अडकलेल्या कारने क्षणार्धात पेट घेतला आणि आगीचा मोठा भडका उडाला. तीनही जळत असलेली वाहने काही अंतर पुढे जाऊन थांबली. अपघातातील दोन्ही ट्रक राजस्थान पासिंगचे असल्याची माहिती समोर आली आहे, तर जळालेल्या चारचाकी वाहनाची माहिती अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, पुण्यातील या भीषण अपघातात कारमधील पाच प्रवाशांसह कंटेनर चालक आणि सोबत असलेल्या क्लिनरचा देखील मृत्यू झाला. एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन महिला, एक लहान बाळाचा आणि चार पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय 20 ते 22 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवून बचावकार्य सुरू केले. वाहने एकमेकांमध्ये इतकी अडकली होती की, त्यांना बाजूला करण्यासाठी कटर आणि क्रेनचा वापर करावा लागला. घटनास्थळी दहा रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. या दुर्दैवे घटनेनं राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या या भीषण अपघातामध्ये (Pune Navale Bridge Accident)काही क्षणांतच ८ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० ते २२ जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये एक ३ वर्षांची चिमुकलीचाही समावेश आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.(Pune Navale Bridge Accident)
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना धडक दिली. दरम्यान, प्रामुख्याने कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिड्रोल टँकला आग लागली आणि क्षणार्धात आगीचे लोट दिसू लागले.
सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला देखील कंटेनरने पाठीमागून धडक दिली, कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. कारमध्ये असलेले दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला
प्रत्यक्षदर्शी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्व्हिस रोडवर असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पीत उभे होते. तितक्यात मोठा आवाज आल्याने ते हायवेच्या धावले आणि बघितले तर एक मोठा कंटेनर आठ ते दहा वाहनांना धडक देत येताना समोर दिसला. समोर एका कारला व ट्रकला धडक दिल्यानंतर तो कंटेनर जागेवर थांबला. मात्र क्षणार्धात कारने व कंटेनरने पेट घेतला. आग एवढी मोठी होती की अशा प्रसंगी आम्ही काहीच करू शकलो नाही.
आणखी वाचा