गेल्या ८ वर्षांत नवले पुलावर २१० अपघात
८२ मृत्यू झाल्याची माहिती
हा ब्रीज आता 'डेथ स्पॉट' म्हणून ओळखला जातो
पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी झालेल्या अपघातामुळे ८ जणांना मृत्यू झाला तर १५ जणं जखमी झाले. मृत्यूखी पडलेल्या ८ जणांमध्ये ५ पुरुष ३ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. पुण्यातील कात्रज बोगदा ओलांडल्या नंतर एका कंटेनर चा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यात येणाऱ्या ८ ते १० वाहनांना धडक दिली. पुढे एका कंटेनरला धडक देण्यापूर्वीच त्याच्या समोर असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ते वाहन दोन्ही कंटेनरच्या मध्यभागी सापडलं आणि अग्नितांडव झाला.
घटनास्थळी आगीचे लोण दूरपर्यंत पोहचले. तातडीने पोलिसांनी, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अपघात इतका भयानक होता की मध्यभागी अडकलेल्या चारचाकीचा चक्काचूर झाला होता.
लग्नसराईत सोनं स्वस्त! २४ कॅरेट १० तोळं सोन्याचे भाव ८ हजारांनी घसरले, वाचा आजचा लेटेस्ट दरगेल्या काही वर्षांपासून पुण्यातील नवले पूल हा सातत्याने या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आहे. मागील ८ वर्षात नवले पुलावर २१० अपघात घडले ज्यात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक स्थानिक नागरिक तर या रस्त्यावरून प्रवास करणे टाळतात. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यापासून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत या पुलाबाबत अनेक वेळा चर्चा, बैठका आढावा घेण्यात आल्या मात्र परिस्थिती अजूनही जैसे थे आहे.
महामार्गाची चुकलेली रचना हे या अपघाताचं मुख्य कारण आहे. बंगलोर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कात्रजचा नवीन बोगदा आहे. हा बोगदा संपला की नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. या उतारामुळे चालकाचं ट्रक किंवा गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि अपघात घडतात. सततच्या अपघातांमुळे या रस्त्याला किंवा या स्पॉटला "डेथ स्पॉट" किंवा "अपघाताचा हॉटस्पॉट" म्हणलं जातं.
गेल्या ३ वर्षात नवले पुलावर किती अपघात?
वर्ष: २०२३
एकूण अपघात: ८
मृत्यू: ९
जखमी (किरकोळ आणि गंभीर): २
वर्ष: २०२४
एकूण अपघात: ४
मृत्यू: ५
जखमी (किरकोळ आणि गंभीर): ५
वर्ष: २०२५ (ऑक्टोबर पर्यंत)
एकूण अपघात: १४
मृत्यू: ७
जखमी (किरकोळ आणि गंभीर): ११
नवले पुलाजवळसातत्याने होणाऱ्या अपघातांचे ३ प्रमुख कारणे कोणती?
- कात्रज बोगदा ओलांडला की तीव्र उतार आहे ज्यामुळे अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणे कठीण होतं
- राष्ट्रीय महामार्ग असल्याने सतत वाहनांची ये जा असते तसेच सेवा रस्ता नसल्याने अनेक दुचाकीस्वार येथून वाहनं चालवतात
- ट्रक, कंटेनर सारख्या वाहनांचे चालक इंधन वाचवण्यासाठी या तीव्र उतारावर आले की गाड्या 'न्यूट्रल' करतात परिणामी वाहनांवरील ताबा सुटतो
मंत्र्यांकडूनच मतदार यादीत घोळ; अंबादास दानवेंचा आरोप, नेमकं प्रकरण काय?या वर्षी नवले पुलावर झालेल्या अपघातांची यादी
- २५ जानेवारी २०२५: भरधाव स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिली ज्यामध्ये २ जणांचा मृत्यू
- ३ मे २०२५: एका महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सीडिज चालवत एका तरुणाला धडक दिली ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला
- ३ मे २०२५: ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने तीन वाहनांना धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याच दिवशी सकाळी अवजड वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला
- ६ ऑगस्ट २०२५: भरधाव येणाऱ्या एका वाहनाने अनेक चारचाकी वाहनांना दिली धडक, सुदैवाने यात जीवितहानी नाही
आता अपघातगुरूवारी झाला त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस या बाबत बऱ्याच चर्चा होतील. लोकप्रतिनिधी याठिकाणी येऊन पाहणी करतील लवकरात लवकर उपायोजना राबवण्याचे आश्वासन देतील. अनेक संघटना आणि राजकीय पक्ष आंदोलनं करतील तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करायला येतील, वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवू असं देखील सांगतील. गेल्या अनेक वर्षांपासून या सर्व गोष्टींना आता कुठेतरी थांबवून खरंच जर उपाययोजना राबवल्या गेल्या तरच इथले अपघात रोखले जातील असे सामान्य नागरिकांचे परखड मत आहे.