Navale Bridge Accident: नवले पुलावर का होतात अपघात? काय आहेत कारणे? आता पूल क्रॉस करण्याचीही भीती वाटते का?
esakal November 14, 2025 03:45 PM

काल गुरुवारी (१३ नोव्हेंबर २०२५) रोजी नवले पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. रस्त्याने येणाऱ्या अनेक गाड्या कंटेनरने उडवून दिल्या. यामुळे गाड्यांना आग लागली आणि अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला. नवले पुलावर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. तरीही प्रशासन ढिम्म राहिले आहे. तात्पुरत्या उपाययोजना केल्या की बस... पण वेगाने येणाऱ्या गाड्या कोण थांबवणार, असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो.

महत्त्वाची कारणे

नवले पुलावर अपघात घडण्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. नवले पूल ते भूमकर चौकादरम्यान वाहतूक पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. अपघात किंवा वाहतूक कोंडीच्या वेळी तातडीने उपाययोजना करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. उतार कमी करणे शक्य नसले, तरी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी छोटे गतीरोधक, चेतावणी फलक, झिगझॅग पद्धतीचे पट्टे, रिफ्लेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत आवश्यक आहे. नवले पूल, वडगाव पूल, स्वामी नारायण मंदिर परिसर आणि भूमकर चौक हे अपघातप्रवण क्षेत्र आहे.

नेकदा वाहनांचा ताबा सुटतो

कात्रज बोगद्याच्या उतारावरून अनेकदा वाहनांचा ताबा सुटतो. त्यामुळे दुसऱ्या वाहनांना धडक देणाऱ्या घटना घडतात. तरीही कोणत्याही ठोस उपाययोजना होत नाहीत.

प्रशासनाने सुरक्षा सुधारणेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. नवे सिग्नल, फलक, रस्त्यांची दुरुस्ती आणि बॅरिगेट्स बसवल्याचे दाखवले जाते. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रभावी उपाययोजना झाल्या नाहीत. प्रत्येक अपघातावेळी ‘ब्रेक फेल’ हे कारण सांगून फाइल बंद करण्यात येते.

Navale Bridge Accident: ब्रेक फेल, नियंत्रण सुटलं अन्.. अपघात नेमका कसा झाला? | Sakal News रस्त्यावरील तीव्र उतार

नव्या कात्रजबोगद्यापासून पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावरील तीव्र उतार (स्लोप) हे बहुतांश अपघातांचे मूळ कारण आहे.

ब्रेकचा जास्त वापर

शिंदेवाडी बोगद्यातून बाहेर पडल्यापासून नवले पुलाकडे येईपर्यंत सलग उतार आहे. त्यामुळे ट्रक आणि कंटेनर चालक इंधन वाचवण्यासाठी वाहने ‘न्यूट्रल’मध्ये चालवतात. यात ब्रेकचा जास्त वापर होतो आणि ब्रेक निकामी होतात.

नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने-

हा पूल व्यस्त मार्ग आहे. नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने, नियमित वाहतूक आणि पादचाऱ्यांची सततची हालचाल अपघातांची शक्यता वाढवते. अशा परिस्थितीत आता नवले पूल क्रॉस करतानाच भीती वाटते.

Navale Bridge Accident : देवदर्शनावरुन परतले, हाकेच्या अंतरावर घर होतं पण... नवले पुलावर ३ वर्षांच्या चिमुकलीसह अख्खं कुटुंबच संपलं
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.