सुजित गायकवाड
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर २५ डिसेंबरला विमानतळाहून प्रत्यक्षात पहिले व्यावसायिक विमान उडणार आहे. सलग तीन महिने डोमेस्टिक प्रवासीसेवा सुरू राहणार आहे. यात गोवा, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, केरळ अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये सेवा दिली जाणार असल्याचे समजते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला करण्यात आले; परंतु त्यानंतर विमानतळाहून प्रवासी सेवा सुरू झाली नव्हती. विमानतळावर सुरक्षाविषयक यंत्रणा बसवण्यासाठी आणि सुरक्षा दलाला तैनात करण्यासाठी ४५ दिवसांकरिता विमानतळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर सर्व सुरक्षाविषयक खबरदारी घेतल्यानंतर विमानतळ सुरू करण्यात येत आहे. परंतु विमानतळ टर्मिनल इमारतीमध्ये अंतर्गत सजावट आणि सुविधाविषयक कामे अंतिम टप्प्यात असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा लगेच सुरू होणार नाही, असे एनएमआयएएलकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले होते.
Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!विमानतळाहून तत्काळ डोमेस्टिक सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापन आग्रही होते. सध्या एनएमआयएएल विमानतळ चालवणाऱ्या कंपनीसोबत एअर इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपन्यांनी प्रवासी सेवा सुरू करण्याबाबत करार केला आहे. त्यानुसार एनएमआयएएलने या कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर २५ डिसेंबरपासून प्रवासी सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने पत्र दिल्याचे समजते आहे.
जगभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने सुट्ट्यांच्या हंगामात विमानसेवांमध्ये मागणी वाढते. ही बाब लक्षात घेत नवी मुंबई विमानतळाहून ख्रिसमससारख्या सणाच्या काळात मुंबई, नवी मुंबईकरांना पहिल्यांदा नवी मुंबईच्या जमिनीहून उडण्याचा अनुभव घेता येणार आहे. दिवसभरात १२ उड्डाणे होणार असल्याचे समजते आहे. गोवा, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, केरळ अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये सेवा दिली जाणार असल्याचे समजते.
पहिली विमानवाहू युद्धनौका कधी बांधली गेली?