'आता गुवाहाटी फाइल्स...' मंगेश देसाई यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले...'आता धर्मवीर 3 नाहीतर...'
esakal November 14, 2025 03:45 PM

मंगेश देसाई यांचा धर्मवीर हा सिनेमा शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. धर्मवीर हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एकनाथ शिंद यांनी काही आमदार आणि खासदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. तसंच भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काही दिवस धर्मवीर 2 हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमामध्ये एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन का केली? हे दाखवण्यात आलं होतं.

दरम्यान अशातच एका मुलाखतीत मंगेश देसाई यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. मंगेश देसाई सध्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. दरम्यान या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. नुकीत मंगेश देसाई यांनी तारांगणला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांना धर्मवीर 3 संदर्भात एक अपडेट दिली आहे.

मंगेश देसाई यांना सिनेमा 'धर्मवीर 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मंगेश देसाई म्हणाले की, 'आधी धर्मवीर, नंतर धर्मवीर २ आणि मी जर सिनेमा केला तर धर्मवीर 3 नाही तर 'गुवाहाटी फाईल्स' या नावाने सिनेमा करेल. तसंच तो सिनेमा 2027-2028 या दरम्यान करेन. परंतु अजून या सिनेमाबाबत नक्की असं काहीच नाही.'

View this post on Instagram

त्यामुळे प्रेक्षकांना सध्या या सिनेमाची वाट पाहावी लागणार आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांना आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. आता 'गुवाहाटी फाइल्स' मध्ये काय पहायला मिळणार? असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये पडताना दिसतोय. सध्या मंगेश देसाई यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Viral Video: बाबो... विजय देवरकोंडाने सगळ्यासमोर रश्मिकाला केलं किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.