Viral Video: बाबो... विजय देवरकोंडाने सगळ्यासमोर रश्मिकाला केलं किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल
esakal November 14, 2025 03:45 PM

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि वजय देवरकोंडा हे सध्या चर्चेत आहे. रश्मिका लवकरच विजयसोबत लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसापूर्वी विजय आणि रश्मिकाने गुपचूप साखरपुडा उरकला. आता ते फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. ते डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची माहितीही आहे. परंतु या सगळ्यात दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल भय्यानी या पापाराझीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडिओ एका कार्यक्रमातील असल्याचं पहायला मिळतय. व्हिडिओमध्ये रश्मिका आणि विजय पहायला मिळताय. या व्हिडिओमध्ये रश्मिकाने साडी घातल्याचं दिसून येतय. या साडीत रश्मिका अतिशय सुंदर दिसत आहे.

व्हिडिओमध्ये विजयने ब्लू कलरचं जॅकेट आणि आत लाल शर्ट असा हटके लूक केला होता. या व्हिडिओमध्ये एवढ्या गर्दीमध्ये विजयने रश्मिकाला टाळी देत किस करतो. परंतु हे किस त्याने तिच्या हातावर केलय. सगळ्यासमोर विजयने हातावर किस केल्यानं रश्मिकाचा चेहरा लाल झाल्याचं व्हिडिओमध्ये पहायला मिळतय.

सध्या रश्मिका आणि विजय देवरकोंडा याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडिओ पाहून विजयच्या रोमँटिक अंदाजाचं कौतूक केलं आहे. चाहत्यांना त्याचा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भरभरुन कमेंट्स येताना पहायला मिळताय.

View this post on Instagram

गेल्या काही वर्षापासून विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत आहे. तरीही त्यांनी त्यांचं रिलेशनशिप अजून सर्वांसमोर जाहीर केलेलं नाही. एका रिपोर्टनुसार विजय आणि रश्मिकाने 3 ऑक्टोंबर रोजी लग्न केलं आहे. आणि 26 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहे. उदयपूरमध्ये त्यांचं शाही लग्न पार पडणार असल्याच्या चर्चा आहे.

Viral Video: यारी असावी तर जय-विरू सारखी! जिगरी मित्राला भेटायला धर्मेंद्र यांच्या घरी स्वत: गाडी चालवत पोहचले बिग बी अमिताभ
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.