श्रेया घोषाल हिच्या इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी, पोलिसांचा लाठीचार्ज, 3 जण बेशुद्ध आणि…
Tv9 Marathi November 14, 2025 03:45 PM

Shreya Ghoshal Live Concert : कटकमधील ऐतिहासिक बाली यात्रा मैदानावर गुरुवारी संध्याकाळी गायक श्रेया घोषाल (Shreya Ghoshal ) हिच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी झाली. श्रेया घोषाल हिचा गोड आवाज प्रत्येक्षात अनुभवण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. पण झालेल्या चेंगराचेंगरीत 3 जण बेशुद्ध झाले. ही घटना स्टेज बॅरिकेडजवळ घडली, जिथे बॉलीवूडची लोकप्रिय गायिका श्रेया हिची एक झलक पाहण्यासाठी मोठा जमाव जमला होता. प्रचंड गर्दीमुळे गोंधळ उडाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसारस 9 दिवस चालणाऱ्या बाली यात्रा महोत्सव संपला आहे.

रिपोर्टनुसार, गुरुवारी श्रेया घोषाल हिचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरु झाला तेव्हा, स्टेजच्या आजूबाजूला चाहत्यांची मोठी गर्दी जमली… गर्दी स्टेजजवळ चाहत्यांची इतकी गर्दी जमली की परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. स्टेजजवळील बॅरिकेड्सही तुटले… धक्काबुक्की आणि हाणामारी सुरू झाली. श्रेया हिला जवळून पाहण्यासाठी गर्दीत चेंगराचेंगरी झाली.

चेंगराचेंगत 3 जण बेशुद्ध..

झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. चेंगराचेंगरीत तीन जण बेशुद्ध पडले… रिपोर्टनुसार, उष्णतेमुळे आणि धडकेमुळे तिघेही जमीनीवर कोसळले. परिस्थिती बिकट होत असल्याचं पाहून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सुरक्षा आणि पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई केली. गोंधळ शांत करण्यासाठी त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला.

बेशुद्ध झालेल्या लोकांवर तात्काळ उपचार करण्यात आले… डॉक्टरांची टीम देखील घटनास्थळी तात्काळ पोहोचली आणि त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कार्यक्रमांदरम्यान कोणतीही मोठी घटना घडली नाही. पोलिसांनी लोकांना घाबरू नका आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं.

श्रेया घोषाल हिच्याबद्दल सांगायचं झालं  तर, आज तिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. आतापर्यंत श्रेया हिने बॉलिवूडसाठी अनेक गाणी गायली आहेत… श्रेया हिच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे… ‘चिकनी चमेली’, ‘झालिमा’, ‘धांगो से बांधा’, ‘दो अंजान अजनबी’, ‘तेरे लिए’, ‘दील डुबा’, ‘हमारी शादी मैं’, ‘तबाह हो गए’, ‘मेरे ढोलना’, ‘बरसो रे’ यांसरखी असंख्य गाणी श्रेया घोषाल हिने गायली आहेत. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल  होत असतात. सोशल मीडियावर देखील श्रेया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.