Morning Breakfast Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चविष्ट पोटॅटो चिला, नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी!
esakal November 14, 2025 04:45 PM

Easy Breakfast Ideas For Kids In Marathi: बालदिन म्हटलं की मुलांसाठी काहीतरी खास बनवण्याचा उत्साह प्रत्येक घरात असतो. सकाळचा नाश्ता जर पौष्टिक आणि चविष्ट असेल, तर दिवसाची सुरुवातही आनंदी होते. म्हणूनच आज पोटॅटो चिलाची रेसिपी सांगाणार आहोत. जी मुलांना आवडेल आणि आईलाही बनवायला अगदी सोपी आहे. ही रेसिपी केवळ चवदारच नाही तर मुलांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, कारण यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरचे मुबलक प्रमाण आहे. शाळेच्या डब्यात द्यायला किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट तयार होणारी डिश उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया पोटॅटो चिला बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

पोटॅटो चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बटाटा

बारिक चिरलेला कांदा

बारिक चिरलेली कोथिंबीर

मीठ

लाल तिखट

हळद

ओवा

पाणी

गव्हाचे पीठ

चिलि फ्लेक्स

ओरेगॅनो

Morning Breakfast Recipe: 15 मिनिटांत मुलांचा डब्बा तयार मुलेही होतील खुश, ट्राय करा हा सोपा पदार्थ, लगेच लिहून घ्या रेसिपी
View this post on Instagram
पोटॅटो चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

सर्वात आधी किसलेला बटाटा एका बाउलमध्ये घ्यावे. नंतर त्यात ओवा, चिलि फ्लेक्स, मीठ, ओरेगॅनो, गव्हाचे पीठ, कोथिंबीर आणि पाणी टाकून चांगले मिक्स करावे. नंतर बारीक चिरलेला कांदा, हळद, लाल तिखट टाकून चांगले मिसळा. नंतर तवा गरम करावा. नंतर तेल टाकून चिला बनवावा. पोटॅटो चिला टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करु शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.