आष्टी (शहीद) : जांब नदीवर पोहायला जातो म्हणून घरून निघून गेलेला तरुण रात्र झाल्यावरही घरी परत आला नाही. त्याचा शोधाशोध केला असता गुरुवारी (ता. १३) जांब नदीच्या पाण्यात त्याचा मूतदेह मिळून आला.
या घटनेची माहिती बांबरडा गावात येताच एकच खळबळ उडाली. दर्शन दिलीप मडावी (वय १९) असे मृताचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील बांबरडा येथील शेतकरी दिलीप मडावी यांच्याकडे शेती असून त्यांना दोन मुले आहे.
यंदा झालेल्या अतिवृष्टीचा फटका त्यांना बसला. त्यांचा लहान मुलगा हा शेतीची कामे करून परिवराचा उदर निर्वाह करतो. दरम्यान लहान मुलगा दर्शनने जांब नदीवर पोहायला जातो असे सांगून तो घरून निघाला.
रात्री घरी परत आला नाही. जांब नदीच्या शिवारात एक महिलेला नदीच्या काठावर मोबाईल, कपडे, व इतर साहित्य दिसून आले. या घटनेची प्रथम पोलिस पाटील मोहित बगळेकर यांना माहिती देण्यात आली.
Jayasingpur Crime : जयसिंगपूर हादरलं! मुलाच्या वाढदिवसाची पार्टी पित्यासाठी ठरली अखेरची; पार्टीत दगडाने ठेचून मित्रांकडून खूनपोलिस पाटलांनी ही माहिती आष्टी पोलिसांना देऊन दर्शनच्या आई वडिलांना सुद्धा दिली. आष्टी पोलिस गजानन वडनेरकर, प्रवीण बंडवाल यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दर्शनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे.