Truck Accident: ट्रकला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार; बेलवडे हवेलीनजीक अपघात, एक गंभीर
esakal November 14, 2025 05:45 PM

उंब्रज : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत  समाेरून चाललेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.

आज सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. स्वरूप संतोष वाघमारे (मूळ रा. कण्हेरखेड, ता. कोरेगाव, सध्या रा. कुमठेफाटा) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मनोज गुलाब जगदाळे (रा. कोलवडी, ता. कोरेगाव) गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांची माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याकडून कऱ्हाडकडे जाणारा ट्रक (एमएच ११ डीडी ९६३३)  हा बेलवडे हवेली हद्दीतून जात असताना भरधाव वेगात पाठीमागून आलेली दुचाकीस्वाराने (एमएच ११ डीआर २३५२) ट्रकला पाठीमागून धडक दिली.

या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे जण रस्त्यावर पडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक जण गंभीर जखमी झाला. तळबीड पाेलिसांना अपघाताची माहिती समजताच हवालदार शहाजी पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Tractor Accident: ट्रक-ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; मध्यप्रदेशच्या हिवरा शिवारातील घटना

जखमीला कऱ्हाड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची फिर्याद ट्रक चालक आनंद माधव बाबर (रा. जांब, ता. वाई) यांनी तळबीड पोलिसात दिली आहे. सहाय्यक फौजदार आनंदा रजपूत तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.