ढाका : भारतीय तिरंदाजांनी गुरुवारी अचूक लक्ष्यभेद करताना पदकांची लयलूट केली. भारतीय खेळाडूंनी बांगलादेश येथील ढाका येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावताना देदीप्यमान यश संपादन केले.
भारतीय खेळाडूंनी महिला एकेरी, महिला सांघिक, मिश्र सांघिक या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या मिश्र प्रकारात मात्र भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ज्योती सुरेखा वेन्नम हिने महिला एकेरी व सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावत दुहेरी धमाका केला.
महिलांच्या कंपाउंड प्रकाराच्या अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडूंमध्ये झुंज रंगली. ज्योती वेन्नम आणि प्रीतिका प्रदीप यांच्यामध्ये सुवर्णपदकासाठी लढाई झाली. या लढतीत ज्योती वेन्नम हिने १४७-१४५ अशी बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. प्रीतिका प्रदीप हिने रौप्यपदक जिंकले. बांगलादेशच्या मोस्ट कुलसुम अक्तेर हिने ब्राँझपदक पटकावले.
महिला सांघिक कंपाउंड प्रकारात भारत व दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सुवर्णपदकाची लढत पाहायला मिळाली. या प्रकारात दीपशिखा, ज्योती सुरेखा वेन्नम व प्रीतिका प्रदीप या खेळाडूंनी भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय महिला तिरंदाजांनी दक्षिण कोरियन संघाला २३६-२३४ असे पराभूत करताना सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.
अभिषेक-दीपशिखाचे यशअभिषेक वर्मा व दीपशिखा या भारतीय जोडीने मिश्र कंपाउंड प्रकारात बांगलादेशच्या जोडीला १५३-१५१ असे नमवत भारताला दिवसातील तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दक्षिण कोरियाने ब्राँझपदकासाठीच्या लढतीत कझाकस्तानच्या जोडीवर १५६-१५५ असा एका गुणाने विजय मिळवला.
World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण सुवर्णपदक हुकलेपुरुषांच्या कंपाउंड सांघिक प्रकारात भारताचे सुवर्णपदक हुकले. या प्रकारात प्रथमेश फुगे, साहिल जाधव व अभिषेक वर्मा या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. कझाकस्तानच्या तिरंदाजांनी सुवर्णपदकासाठीच्या लढतीत भारतीय संघावर २३०-२२९ असा विजय साकारला. त्यामुळे भारतीय तिरंदाजांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात कोरियाने शूट ऑफमध्ये थायलंडला पराभूत करीत ब्राँझपदक पटकावले.