लाभांशाची घोषणा करूनही शेअर्सची घसरण थांबली नाही, 6 टक्क्याने आपटला, 'हे' आहे कारण
ET Marathi November 14, 2025 06:45 PM
मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी सोनाटा सॉफ्टवेअरच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल निराशाजनक आले आहेत. त्यामुळे मोठी विक्री होऊन शेअर्सने घसरण नोंदवली. कंपनीने लाभांश जाहीर करूनही शेअर्स ६.६२% ने घसरून ३६३.८० रुपयांवर आला.

Sonata Software च्या सप्टेंबर तिमाही नफ्यात १०% वाढ झाली, मात्र, या कालावधीत महसुलात २८% घट झाली. त्यामुळे शेअर्स आपटला. लाभांश घोषणा केली असली तरीही घसरण रोखता आली नाही. चालू आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत सोनाटा सॉफ्टवेअरचा निव्वळ नफा १२० कोटी रुपयांवर पोहोचला. परंतु या कालावधीत कंपनीचा महसूल २८.५% ने घसरून २,११९.३ कोटी झाला.

ऑपरेटिंग पातळीवर या कालावधीत Sonata Software चा EBITDA 9.2% ने वाढून 146.3 कोटी रुपये झाला. तर EBIT मार्जिन 4.5% वरून 6.9% पर्यंत वाढला. निकालांसह कंपनीने या आर्थिक वर्ष 2026 साठी दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनी प्रति शेअर 1.25 रुपये लाभांश देणार आहे.या लाभांशाची रेकॉर्ड तारीख 21 नोव्हेंबर 2025 आहे. लाभांश 3 डिसेंबरपर्यंत पात्र भागधारकांना दिला. जाईल.

सोनाटा सॉफ्टवेअरचे एमडी आणि सीईओ समीर धीर यांनी म्हटले की, की सप्टेंबर तिमाहीत इंटरनॅशनल आयटी सर्व्हिसेसने स्थिर वाढ अनुभवली. कंपनीने आरोग्यसेवा क्षेत्रात एक मोठा करार मिळवला, जो मोठ्या प्रमाणात करार आणि वेळेवर वितरणावर लक्ष केंद्रित करतो. एआयमध्ये सुरू असलेली धोरणात्मक गुंतवणूक आता निकाल देत आहे, सप्टेंबर तिमाहीत एआय-संबंधित ऑर्डर त्यांच्या एकूण ऑर्डर बुकच्या अंदाजे 10% आहेत. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने तिन्ही क्षेत्रांमध्ये नवीन ग्राहक जोडले, विशेषतः मायक्रोसॉफ्ट एसएमसी सेगमेंटमध्ये जोरदार वाढ दिसून आली.

सोनाटा सॉफ्टवेअरचे शेअर्स १२ डिसेंबर २०२४ रोजी ६८७.३५ रुपयांच्या एक वर्षाच्या विक्रमी उच्चांकांवर होते. या उच्चांकावरून शेअर्स फक्त चार महिन्यांत ५८.३३% ने घसरून ७ एप्रिल २०२५ रोजी २८६.४० रुपयांवर आले. शेअर्ससाठी हा एक वर्षाचा विक्रमी नीचांकी आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.