थंडी हळूहळू आता जाणवू लागली आहे. थंडीची चाहूल लागताच अनेकांचे फिरण्याचे प्लॅन सुरू होतात. थंडगार वातावरणात भटकंतीची मज्जा काही औरचं असते. तुम्ही सुद्धा नोव्हेंबर – डिसेंबमध्ये पिकनिकचे आयोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. थंडीच्या दिवसात उत्तर भारत फिरण्यासाठी उत्तम सांगितला जातो. आज आपण उत्तर भारतातील अशी ठिकाणे जाणून घेऊयात जेथे गेल्यावर तेथील थंडीची मज्जा तर घेता येईलच शिवाय रमणीय दृश्य पाहून मन मोहून जाईल.
श्रीनगर –
पृथ्वीवरील नंदनवन पाहायचे असल्यास श्रीनगर उत्तम पर्याय आहे. येथील डल लेक, सुंदर बागा मंत्रमुग्ध करतील. येथे हिवाळ्यात बर्फवृष्टी होते. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी महिना श्रीनगर फिरण्यासाठी उत्तम आहे.
जैसलमेर –
हिवाळ्यासाठी जैसलमेर एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथील पटवों की हवेली, सोनार किल्ला आणि जैन मंदिर पाहण्यासाठी उत्तम आहे. याशिवाय जैसलमेरचा किल्ला राजस्थानी वास्तुकलेचे प्रतीक आहे.
हेही वाचा – गोव्यात स्वस्त दारू मिळण्याचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
धर्मशाळा –
निसर्गरम्य हिल स्टेशन पाहायचे असेल तर हिमाचलमधील धौलाधार पर्वतरागांमध्ये स्थित धर्मशालाला भेट द्यावी. येथे तुम्हाला इंडो-तिबेट संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळेल. ट्रेकिंगची आवड असेल तर धर्मशाळा येथे डिसेंबरमध्ये नक्कीच जाऊ शकता.
जयपूर –
हिवाळ्यात फॅमिली पिकनिकचा प्लॅन असेल तर जयपूर हे ठिकाण उत्तम आहे. जयपूरला गुलाबी शहर (Pink City) असे म्हणतात. येथील भव्य जैन मंदिर आणि किल्ल्यांच्या भव्यतेचा शाही अनुभव तुम्हाला घेता येईल.
हेही वाचा – Winter Styling Tips: थंडीत स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ट्रेंडिंग आऊटफिट्स