टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने 159 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करम याने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर भारतासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर टीम इंडियाने 159 धावांच्या प्रत्युत्तरात खेळ संपेपर्यंत 20 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 37 धावा केल्या. टीम इंडिया 122 धावांनी पिछाडीवर आहे. केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी नाबाद परतली. तर यशस्वी जैस्वाल याच्या रुपात भारताने एकमेव विकेट गमावली. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवून मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी भारतीय फलंदाजांवर असणार आहे.