KKR appointed new bowling coach : न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टिम साउदी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेसाठी कोलकाता नाईट राडयर्सने त्याच्यावर गोलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी टाकली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकात्याची कामगिरी काही खास नव्हती. त्यामुळे फ्रेंचायझीने कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत टिम साउदी आता गोलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे. टिम साउदीकडे आयपीएल स्पर्धेच्या दांडगा अनुभव आहे. आयपीएल स्पर्धेत चॅम्पियन संघांचा भाग राहिला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससोबत विजयाची ट्रॉफी उचलली आहे. त्यामुळे त्याची क्षमता ओळखूनच कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर जबाबदारी टाकली आहे. आता त्याच्या कारकिर्दीत कोलकात्याचा संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे.
टिम साउदी कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत खेळाडू म्हणूनही खेळला आहे. टीम साउदी 2021, 20211 आणि 2023 रोजी संघाचा भाग होता. पण आता त्याच्या खांद्यावर गोलंदाजांना योग्य प्रशिक्षण देण्याची असणार आहे. टिम साउदीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षांचा अनुभव आहे. या काळात त्याने 100हून अधिक कसोटी, 150हून अधिक वनडे आणि 120हून अधिक टी20 सामने खेळले आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर इंग्लंड संघासोबत गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहीलं.
कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील होताच टिम साउदीने सांगितले की, घरवापसी केल्यासारखं वाटत आहे. नव्या भूमिकेसाठी तयार आहे आणि आयपीएल 2026 स्पर्धेत संघाला यश मिळवून देण्यास उत्सुक आहे. मागच्या पर्वात संघाच्या सुमार कामगिरीनंतर केकेआरने या पर्वात काही बदल केले आहेत. सपोर्ट स्टाफमधील हा तिसरा बदल आहे. यापूर्वी अभिषेक नायरला मुख्य प्रशिक्षक आणि शेन वॉटसन याची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता संघात काही बदल होणार हे निश्चित आहे. कारण खेळाडूंच्या रिटेन्शची यादी देण्याची 15 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. तसेच 16 डिसेंबरला मिनी लिलाव पार पडणार आहे.