मुंबई : राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईतही पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवला असून, शहरातील विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत पार्किंगची तपासणी सुरू केली आहे.
मुंबईत साडेतीन हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, सर्वाधिक ३२० वाहनांवर कारवाई आझाद मैदान परिसर वाहतूक पोलिसांनी केली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा, पदपथावर, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये कुठेही अनधिकृत पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. याच बेकायदा पार्किंगवरील कारवाईतून संभाव्य धोका टाळण्यासाठी वाहतूक पोलीस उपाययोजना करीत आहेत.
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ प्रवासीसेवेसाठी सज्ज, लवकरच उड्डाण होणार; तारीख आली समोर!दिल्लीबॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत पार्किंगमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.
- डॉ. प्रियंका नारनवरे, अपर पोलिस आयुक्त, वाहतूक
मुंबई पोलिसांची कारवाई२६८६ अनधिकृत पार्किंग
३६२ दुहेरी पार्किंग
३४३ फुटपाथ पार्किंग
१३६ मेट्रो झीरो पार्किंग