इराणने इस्राईल समोर नवे आव्हान निर्माण केले आहे. जेव्हा दोन्ही देशात युद्ध झाले तेव्हा इस्राईलला ज्या गोष्टीची भीती होती,तेच इराणने केले. इराणने अमेरिकच्या एका शस्राच्या तुटलेल्या भागाचा असा वापर केला ज्याच्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान देखील हैराण झाले. इराणने त्यांच्या सैन्य तंत्रज्ञानात एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. इराणने शहीद-161 स्टील्थ UAV च्या जेट इंजिनच्या सार्वजनिक चाचणी केली आहे. तेहराणच्या नॅशनल एअरोस्पेस पार्कमध्ये प्रदर्शित केले आहे.
सर्वसाधारणपणे अशा रिव्हर्स इंजिनियरिंगपासून तयार शस्रास्रांचे प्रदर्शन अशा प्रकारे होत नाही. परंतू या वेळी इराणने उघडपणे हे जगाला दाखवले की तो काय करु शकतो. इराणने कुख्यात शाहेद-161 ड्रोनचा नवीन व्हर्जन तयार केले आहे. जे अमेरिकेच्या RQ-170 ड्रोन रिव्हर्स इंजिनिअरिंग करुन तयार केले आहे. इराणचे हे पाऊल जून 2025 मध्ये इस्राईलशी झालेल्या संघर्षानंतर महत्वाचे मानले जात आहे.
११ नोव्हेंबर २०२५ रोजी IRGC एअरस्पेस फोर्सने शहीद-161 च्या जेट इंजिनला जगासमोर आणले. इराण ड्रोन तंत्रज्ञानात काय करु शकतो हे दर्शवण्यासाठी असे करण्यात आले. शाहेद-161 हे अमेरिकेच्या RQ-170 Sentinel ड्रोनपासून प्रेरणा घेऊन तयार केलेले शहीद स्टील्थ फॅमिलीचे ड्रोन आहे. इराणने २०११ मध्ये RQ-170 च्या तुकड्यांना जप्त केल्यानंतर यावर काम सुरु केले होते. आणि शाहेद-161 ही त्याची जवळपास 40 टक्के कॉपी मानली जात आहे.
शाहेद-161 एक फ्लाईंग विंग डिझाईन असणारा छोटा स्टील्थ ड्रोन असून त्याची लांबी सुमारे 1.9 मीटर आणि विंग स्पॅन 5.1 मीटर आहे. हा एका मायक्रो जेट इंजिनने उडत असून जे 40 किलोग्रॅम थ्रस्ट देते. हा 300–350 किमी प्रति तास वेगाने उडतो आणि सुमारे 7,600–8,000 मीटर उंचीपर्यंत उडू शकतो. याचे वजन 170 किलोग्रॅम असून 40–50 किलोपर्यंत कार्गो वा शस्रास्र नेता येते.
मिशन प्रोफाईल नुसार हा ड्रोन 150 किमीआत पर्यंत शत्रू मुलुखात स्ट्राईक करु शकतो. 300 किमी सीमेत उडू शकतो.या शत्रूची एअर डिफेन्स रडार, कमांड सेंटर अशा महत्वाच्या ठिकाणांना वेगवान आणि लपून हल्ले करण्यासाठी तयार केले आहे.
येथे पाहा पोस्ट –
इराणने आता स्टील्थ ड्रोन विकसित केल्याने पुढे जाऊन हेच तंत्रज्ञान ते ड्रोन, क्रूझ मिसाईल आणि अन्य UAV प्लॅटफॉर्ममध्ये वापरु शकतात. त्यांनी बनवलेले ड्रोन रशिया आणि युक्रेन युद्धातही खूप चर्चेत राहिले आहेत. ज्यामुळे रशियाने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे.