IPL 2026 : अजिंक्य रहाणे याला कर्णधारपदावरुन हटवलं? KKR चा नेतृत्वाबाबत मोठा निर्णय!
Tv9 Marathi November 15, 2025 01:45 AM

आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) 15 किंवा 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार असल्याची शक्यता आहे. त्याआधी क्रिकेट चाहत्यांमध्ये रिटेन्शनबाबत उत्सकुता आहे. एकूण 10 फ्रँचायजींना ते त्यांच्यासोबत कोणते खेळाडू कायम ठेवणार आणि कुणाला करारमुक्त करणार? हे येत्या काही तासात स्पष्ट करायचं आहे. शनिवारी 15 नोव्हेंबरला फ्रँचायजी खेळाडूंचा फैसला करणार आहेत. त्याआधी मुंबई इंडियन्सने ट्रेडद्वारे 2 ऑलराउंडर खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. पलटणनने पालघर एक्सप्रेस शार्दूल ठाकुर आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांना आपल्या गोटात घेतलं. शार्दुल गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स तर शेरफेन गुजरात टायटन्सकडून खेळत होता. मात्र आता हे दोघेही मुंबईसाठी खेळताना दिसणार आहेत. त्यानंतर आता केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

केकेआरने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. केकेआर मराठमोळ्या अजिंक्य रहाणे यालाच कर्णधारपदी कायम ठेवणार असल्याचा दावा क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. केकेआर आगामी हंगामाआधी कर्णधार बदलणार असल्याची चर्चा होती. मात्र आता क्रिकबझनुसार, केकेआर रहाणेलाच कर्णधारपदी कायम ठेवणार असल्याचा दावा आहे.

श्रेयसनंतर अजिंक्यकडे नेतृत्व

केकेआरने अवघ्या काही महिन्यांपूर्वी अजिंक्यची कर्णधारपदी नियुक्ती केली होती. अजिंक्यची 3 मार्च 2025 रोजी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर  वेंकटेश अय्यर याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. श्रेयस अय्यर याच्या जागी अजिंक्यची निवड करण्यात आली. अजिंक्यने 18 व्या मोसमात केकेआरचं नेतृत्व केलं. केकेआरने या मोसमात फलंदाज म्हणून समाधनकारक कामगिरी केली. मात्र अजिंक्य 2024 च्या आयपीएल चॅम्पियन संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात अपयशी ठरला. केकेआरचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं.

अजिंक्यची 18 व्या मोसमातील कामगिरी

अजिंक्यने 18 व्या मोसमात एकूण 13 सामन्यांमध्ये केकेआरचं नेतृत्व केलं. अजिंक्यने या 14 सामन्यांमध्ये 147.73 च्या स्ट्राईक रेटने आणि 35.45 सरासरीने एकूण 390 धावा केल्या. अजिंक्यने या दरम्यान 36 चौकार आणि 20 षटकार लगावले. तसेच अजिंक्यने या दरम्यान एकूण 3 अर्धशतक लगावले.

श्रेयस अय्यर याने केकेआरला त्याच्या नेतृत्वात 2024 साली आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यामुळे अजिंक्यसमोर 18 व्या मोसमात कॅप्टन म्हणून केकेआरला गतविजेता म्हणून शोभेल अशी कामगिरी करण्याचं आव्हान होतं. मात्र अजिंक्य कर्णधार म्हणून कमी पडला. तसेच अपवाद वगळता टीममधील खेळाडूंनी काही खास करता आलं नाही. केकेआरला साखळी फेरीत 14 पैकी फक्त 5 सामनेच जिंकता आले होते. तर केकेआरला 7 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. तर केकेआरचे 2 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.